इंट्रो
लहान थोरांनी केलेला गणपतीचा जयजयकार, घाटांवर विसर्जनासाठी सहकुटुंब आलेले गणेशभक्त, लाडक्या गणपतीला निरोप देताना भावूक झालेले लहानगे, सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांचा थाट, कार्यकर्त्यांनी केलेले नियोजन अशा वातावरणात लाडक्या गणरायाला पिंपरी-चिंचवडकरांनी शनिवारी निरोप दिला. गणेशाची दहा दिवस पूजा केल्यानंतर विसर्जन करताना गणेशभक्त हळवे झाले होते. ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’,‘ पुढच्या वर्षी लवकर या...’ असे म्हणत पुन्हा लवकर येण्याचे आर्जवही भक्तांनी केले. उपनगरांमध्ये सातव्या व दहाव्या दिवशी सार्वजनिक मंडळांचे गणेश विसर्जन केले जाते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून निघणाऱ्या मिरवणुका हे अनंत चतुर्दशीचे खास आकर्षण ठरले. पिंपरीतील कराची चौक व चिंचवडमधील चापेकर चौक येथे महापालिकेच्या वतीने मंडळांचे स्वागत करण्यात आले. रात्री बारा वाजेपर्यंत कराची चौकातून २८, तर चापेकर चौकातून ३१ मंडळे विसर्जनासाठी मार्गस्थ झाली. १२ वाजता आवाज बंद झाल्यानंतरही अनेक मंडळांनी रात्री २ वाजेपर्यंत गणेशाचे विसर्जन केले.
चिंचवडमधील चापेकर चौकात रात्री आठनंतर मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. या दरम्यान तीन वर्षांची एक चिमुकली गर्दीत हरवली. तिच्या पालकांनी महापालिका कक्षाशी संपर्क साधला असता, ध्वनिक्षेपकावरून तशी सूचना देण्यात आली. त्यानंतर पोलिस, पोलिस मित्र व शांतता दलातील स्वसंसेवकांनी शोध घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच चिमुकली सापडली. त्यानंतर तिला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.