हिंजवडीत सहा तास विसर्जन मिरवणुका
हिंजवडी, ता. ७ : हिंजवडी-माण परिसरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकांमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या घोषणा, ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रथ आणि फुलवृष्टीने वातावरण भारावले. सुमारे सहा तास ही मिरवणूक चालली. आयटी कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सायंकाळी पाचच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. रात्री बारापर्यंत म्हणजे तब्बल सहा तास चालली.
एकामागे एक चाललेल्या १५ पेक्षा अधिक मंडळांनी हिंजवडी गावठाणातील पर्यावरणपूरक हौदात
गणरायाचे विसर्जन केले. जय भवानी मित्र मंडळाने आकर्षक रथ साकारला. छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाचा बजरंग बलीचा हालता देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. संत दर्शनाचा देखावा टाळकरी मंडळ व ढोल ताशा पथकांनी सहभाग घेतला.
हनुमान तालीम मंडळाने बजरंग बली रथ साकारला. क्रांती, पंचरत्न, आदर्श, शिवतेज यांनी देखील विशेष आकर्षक रथ तयार केले होते. हिंजवडी ही आयटीनगरी असल्याने मिरवणुकीला पारंपरिक महाराष्ट्रीय संस्कृतीसोबतच आधुनिक स्पर्श दिसून आला. ढोल-ताशा पथके, लेझीम पथके आणि डीजे बिट्सने युवकांना आकर्षित केले. रंगीत फुलांचा वर्षाव, सजवलेल्या गणेशमूर्ती आणि भाविकांच्या नृत्यात मिरवणूक अधिक रंगीबेरंगी झाली. विशेष म्हणजे, आयटी कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांनी गणपतीला निरोप देताना भावुक क्षण अनुभवले. निरोप घेता देवा, आता आज्ञा असावी, हे भजन म्हटले. वर्षभर दैनंदिन कामकाजात व्यस्त असलेले हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांनी उत्सवातून कुटुंबासोबत एकत्र येऊन आनंद लुटला. मिरवणुकीनंतर विसर्जन स्थळी आरती, भजन आणि प्रसाद वितरणाने समारोप झाला.
PNE25V47526
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.