सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

डीपी बॉक्सना झाकणे बसवा
चिंचवड एमआयडीसीतील संभाजीनगर येथील बजाज शाळा चौकातील महावितरणच्या डीपी बॉक्सला झाकण नाही. असुरक्षित परिस्थितीतच डीपी उघडा आहे. झाकण जवळच पडलेले आहे. परिसरातील बरेच इतर डीपींना पण व्यवस्थित झाकणे लावलेली नाहीत. महावितरणने लक्ष घालावे. योग्य ती कार्यवाही करावी. ही विनंती.
- नितीन नागुल, चिंचवड एमआयडीसी, संभाजीनगर
PNE25V48371

बांधकामाचा चिखल रस्त्यावर
गेली दोन महिन्यांपासून संघवी महाविद्यालय ते चिंचवड रस्त्यालगत बांधकाम चालू आहे. त्याचा चिखल खूप मोठ्या प्रमाणात बाहेर रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहे. पाऊस थांबला की त्या मातीचे धुळीत रूपांतर होत आहे. त्यामुळे महापालिकेने त्याची दखल घेऊन ताबडतोब कारवाई करावी.
- दीपक दातीर, चिंचवड
-PNE25V48370

घरकुलजवळ वाहतूक पोलिस नेमा
स्पाईन रोडवरील घरकुलजवळील चेरी चौकात सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने नागरिक आणि नोकरदार वर्गाला प्रचंड त्रास झाला. सुमारे दोन तास ही वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने इथे वाहतूक पोलिस नेमून वाहतूक सुरळीत करावी. तसेच या चौकात सिग्नलची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि परिसरातील नागरिकांना वाहतुकीचा त्रास होणार नाही.
- बाळासाहेब चंदनशिवे, घरकुल, चिखली
PNE25V48369

बांधकाम यंत्रे हटवा
वाकड येथील भर रहदारीच्या सखाराम वाघमारे चौक ते भुयारी मार्ग रस्त्यावर बांधकाम यंत्रे अनेक महिन्यांपासून पडून आहेत. वाहतुकीस अडचण होत आहे. रात्रीच्यावेळी अपघात होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच यंत्राभोवती फार घाण, कचरा, चिखल झाला आहे. महानगरपालिकेत वारंवार कळवून आणि ‘सारथी’वर तक्रार देऊन सुद्धा दखल घेतली जात नाहीत. तरी ही बांधकाम यंत्रे हटवून रस्ते स्वच्छ करावेत.
- दिलीप बाफना, वाकड
PNE25V48369

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com