संवाद माझा

संवाद माझा

Published on

बीआरटी मार्गातील झाडे कमी उंचीची असावीत
औंध-किवळे बीआरटी मार्गावरील औंध ते साई चौक, जगताप डेअरीपर्यंत (पिंपळे निलख) रस्त्याच्या दुतर्फा मोठे पदपथ व सायकल ट्रॅक बांधण्यात आले आहेत. येथील रस्त्याच्या या विकासकामामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. मात्र, रस्ता व पदपथाच्या मध्ये जी झाडे लावली गेलीत, त्याची उंची ही केवळ दीड-दोन फूटच असावी. कारण, जास्त उंचीच्या झाडांमुळे पदपथ दिसत नाही किंवा पदपथावरून चालणाऱ्या पादचाऱ्यास रस्ता दिसत नाही. त्यामुळे ह्या पदपथावर कचरा टिकणे किंवा मद्यपींसाठी सोईची जागा झाली आहे. त्यामुळे रस्ता व पदपथ यांमध्ये लावलेल्या झाडांची उंची कमीच ठेवावी.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
PNE25V48992

पादचारी मार्गावर पार्किंगमुळे अडचण
पादचारी मार्गावर पार्किंग झाल्यामुळे लोकांना नाईलाजाने रस्त्यावरून चालणे भाग पडते व अपघाताचा धोका संभवतो. दुचाकीपेक्षा चार चाकी वाहने रस्त्यावर सध्या जास्त येत असल्यामुळे पार्किंग समस्या दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे, असे वाटते. याचा जास्त फटका ज्येष्ठ नागरिक यांना बसत आहे. याबाबत महापालिकेने सकारात्मक कृती करणे आवश्यक आहे असे वाटते
- रमेश देव, चिंचवड
PNE25V48993

वाकड येथे महिनाभरापासून पथदिवे बंद
स्कायलाइन सोसायटीजवळ, चौधरी पार्क, वाकड येथे गेल्या महिनाभरापासून पथदिवे बंद आहेत. महापालिकेच्या ‘सारथी’ प्रणालीवर अनेकवेळा तक्रार देऊनही पथदिवे सुरू होत नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला होता, तरी पथदिवे सुरू केले जात नाहीत.
- अॅड. राजू पाटील, चौधरी पार्क, वाकड
PNE25V48996

पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून अर्धवट
डुडुळगावमध्ये चिंबळी-आळंदी रस्त्याला जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल कित्येक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या पुलाचे बांधकाम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. अर्धवट बांधकाम झालेल्या पुलाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. हा पूल डुडुळगावकडून मुख्य रस्त्याला अजूनही जोडलेला नाही. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यास मोशी भारतमाता चौकातील रहदारी कमी होईल. तसेच डुडुळगाव व परिसरातील नागरिकांना चाकण मार्ग रहदारी शिवाय उपलब्ध होईल. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने रस्ता रुंदी, अतिक्रमण, उड्डाणपूल, मेट्रोसारखे अनेक नागरी वस्तीमधील प्रकल्प जलद गतीने पूर्ण केले आहेत. पण, या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत का पडून आहे, त्याच्या मुळाशी जाऊन शोध घ्यावा. करदात्या नागरिकांना त्यांच्या कराचा विनियोग अत्यंत नियोजनबद्ध असतो हे दाखवून द्यावे.
- प्रफुल्ल बाबर, डुडुळगाव
PNE25V48995

महापालिका भवनासमोर ग्रेड सेपरेटरमध्ये खड्डे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोरील ग्रेड सेपरेटरमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. तेथे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होत आहे. वाहतूक जलद व्हावी, यासाठी काही जण खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यासोबतच चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी येथील मार्गिकेतही मोठे खड्डे आहेत.
-तुषार अहिरराव पाटील, पिंपरी

- PNE25V48994

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com