सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

सकाळ संवाद
देहूरोडच्या प्रवाशांची सोय व्हावी
महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) मंडळाच्या पुणे-मुंबई, मुंबई-पुणे तसेच इतरही दूरदूरच्या ठिकाणी जाणाऱ्या बस मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोडच्या उड्डाणपुलाचा वापर करतात. त्यामुळे देहूरोडहून बसने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होते. तरी या एसटी बस उड्डाणपुलावरून खालून गेल्या तर देहूरोडच्या प्रवाशांची सोय होईल. देहूरोडला अधिकृत एसटी थांबा झाला तर आणखी चांगले होईल. तरी एसटी महामंडळाच्या प्रशासनाने याची दखल घ्यावी.
- हिरामण येवले, विकासनगर
--------
कावेरीनगर मंडईतील स्वच्छतागृह बंद
थेरगावमधील कावेरीनगर भाजी मंडईतील स्वच्छतागृह ‘सकाळ’मधील बातमीनंतर काही दिवस सुरू होते. ते परत कुलूप लावून बंद केलेले आढळते. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन हे स्वच्छतागृह कायमस्वरूपी सुरु ठेवले पाहिजे.
- सुहास होनराव, चिंचवड
फोटो आयडी - 80247
----------
सेवा रस्त्यावर अवजड वाहने
ट्रान्स्पोर्ट नगर, भक्ती शक्ती जवळ असलेल्या मुकाई चौक ते निगडी मार्गावरील सेवा रस्त्यावर नो पार्किंग झोनमध्ये अवजड वाहने लावली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊन कोंडी होऊ लागली आहे. वाहतूक पोलिसांनी आत्ताच या गाड्यांवर कारवाई केली नाही तर ही समस्या आणखी बिकट होईल.
- संतोष पडवळ, निगडी
फोटो आयडी - 80243
--------
उघड्यावरील कचऱ्याचा त्रास
साई क्रिस्टल सोसायटी, शिवराजनगर, रहाटणी या भागातील रॉयल मॅजेस्टिक सोसायटी समोर रोज अवैध रित्या कचरा टाकला जात आहे. भटक्या कुत्र्यांमुळे कचरा रस्त्यावर पसरतो. हा रहदारीचा रस्ता असल्याने नागरिकांना खूप त्रास होतो. तरी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच या समस्येचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
- बसवराज पाटील, नागरिक
फोटो आयडी - 80245
-------
मोकळ्या जागेत कचरा
आदर्शनगर, नवी सांगवी येथे शाळेचे आरक्षण असलेल्या मोकळ्या जागेत कचरा व राडारोडा टाकण्यात येतो. क्षेत्रीय कार्यालयात कळवले असता लेखी तक्रार द्या, आमच्या अखत्यारित येत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. या कचऱ्यामुळे आजूबाजूला दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने येथे कचराबंदीचा बोर्ड लावावा तसेच योग्य ती कार्यवाही करावी.
- जितेंद्र अलासे, आदर्शनगर, नवी सांगवी
फोटो आयडी - 80242
--------
पिंपळे निलखमध्ये बस शेड बसवा
हिंजवडी ते पुणे स्टेशन ३३३ नंबरची बस पूर्वी पिंपळे-निलख गावातून जात होती. पण, आता ती बस गावाबाहेरून जाते. गावात शेड होते, बाहेर शेड नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तरी पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांची सोय करावी. ही विनंती.
- मोहन जगताप, पिंपळे निलख
फोटो आयडी - 80241

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com