पिंपरी-चिंचवड
पवन मावळात ‘मावळ बंद’ला प्रतिसाद
सोमाटणे, ता. २९ : मावळात निर्भया अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाजासह सर्व समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘मावळ बंद’ला पवन मावळच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. या बंदला पवनमावळ परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. सोमाटणेसह पवन मावळातील सर्व गावांमध्ये सकाळपासूनच या घटनेचा निषेध नोंदवत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी, व्यावसायिक, विक्रेते तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा दिला.

