भरधाव कंटेनरची दोन वाहनांना धडक, दोघे जखमी

भरधाव कंटेनरची दोन वाहनांना धडक, दोघे जखमी

Published on

तीन वेगवेगळ्या कारवायांत
दीड लाखाचा गांजा जप्त

पिंपरी, ता. ३१ ः बेकायदेशीरपणे गांजा विकणाऱ्या तिघांवर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून एकूण दीड लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजा जप्त केला.
भोसरी पोलिसांनी इंद्रायणीनगर येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळील नाल्यापाशी सोमवारी (ता. २९) रात्री अकराच्या सुमारास अक्षय रामभाऊ माने (वय. २५, रा. सदगुरुनगर, भोसरी, मुळ रा. आळंदी) याला अटक केली. त्याच्याकडून १ लाख ४२ हजार रुपये किमतीचा ८१८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस शिपाई महादेव गुलाब गारोळे यांनी फिर्याद दिली.
गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी मंगळवारी (ता. ३०) थेरगावच्या पवारनगर येथील के. जी. एन. पान टपरीपाशी अल्ताफ साहेब दीन शेख (वय २६, रा. पवारनगर, थेरगाव, मुळ रा. गुरवपट्टी मिर्झापूर, उत्तर प्रदेश) याला अटक केली. त्याच्या ताब्यातील ९ हजार रुपये किमतीचा १८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस हवालदार तुषार अशोक शेटे (वय ३८) यांनी फिर्याद दिली. काळेवाडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. ३०) दुपारी एकच्या सुमारास बोऱ्हाडेवाडीतील जयभारत चौकापाशी अजय अरुण खैरे (वय २७, रा. इंद्रायणी पार्क, कुरुळी, ता. खेड, मुळ रा. सागाव, ता. शिराळा, जि. सांगली) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६ हजार ६०० रुपये किमतीचा ३३२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मारी भाई (रा. खडकवासला, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. पथकातील पोलिस शिपाई संतोष बिभीषण सपकाळ यांनी फिर्याद दिली. एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------
महाळुंगेत कंटेनरच्या धडकेत दोघे जखमी
पिंपरी ः भरधाव कंटेनरची मागून धडक बसल्याने दुचाकीस्वार आणि तीनचाकी चालक असे दोघे गंभीर जखमी झाले. सोमवारी (ता. २९) सायंकाळी साडेआठच्या सुमारास तळेगाव चाकण रस्त्यावरील महाळुंगे गावात ही दुर्घटना घडली. धडक दिल्यानंतर कंटेनर चालक पसार झाला. याप्रकरणी प्रदुम महादेव बगदुरे (वय २७, रा. महाळुंगे, मुळ रा. बसवकल्याण, जि. बदर) यांनी तक्रार दिली. अज्ञात चालकावर उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
बगदुरे रात्री जेवणासाठी दुचाकीवरून चाकणकडे जात होते. कंटेनरच्या धडकेत ते जखमी झाले. कंटेनरने त्यानंतर दिलेल्या धडकेत तीन चाकी वाहन चालक शाम मारुती दतखिळे जखमी झाले.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com