शहरात गुन्हेगारी वृत्त

शहरात गुन्हेगारी वृत्त

Published on

कोयत्याचा धाक दाखवत लुटमार
पिंपरी : कोयत्‍याचा धाक दाखवून एका तरुणाजवळचा मोबाइल, चांदीचे ब्रॅस्लेट आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना रविवारी (ता. ३) रात्री घडली. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आक्याभाई उर्फ आकाश सुभाष आल्हाट (वय २९, रा. राजयोग कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्‍याच्या तीन साथीदारांविरोधात (नाव, ‍पत्ता माहिती नाही)‍ विरोधातही गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. नियाज मोहम्मद अन्सारी (वय ३०, रा. भालचंद्र विहार, भोंडवे बाग समोर, रावेत) याबाबत रावेत पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

भाडेकरूकडून सुरक्षा रक्षकाची फसवणूक
पिंपरी ः एका भाडेकरूने सुरक्षा रक्षकाची फसवणूक करत त्यांच्या नावावर खोटे कागदपत्र वापरून सहा लाख ५५ हजार रुपयांचे चारचाकी वाहन खरेदी केले. ही घटना संतोषनगर, थेरगाव येथे घडली.
संदेश संकेत जुंद्रे (वय ३५, रा. अभय सीएचएस, चिंचपोकळी, मुंबई) असे गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी जयाजीराव दामोदर शिंदे (वय ६४, रा. जांबेगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी वाकड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ पासून थेरगाव येथील साई इंडिया पार्कमध्ये आरोपी भाड्याने राहण्यास आला होता. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून खोट्या कागदपत्रांद्वारे बाणेर येथून वाहन खरेदी करत ६.५५ लाखांची फसवणूक केली.

गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक
पिंपरी ः एका टपरीवरून ३६ हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्री करताना एक जणाला पोलिसांनी अटक केली. निगडी येथील अंकुश चौकात मंगळवारी दुपारी सव्‍वाबारा वाजताच्‍या सुमारास ही कारवाई करण्‍यात आली. जैनुद्दीन अब्बास शेख (वय ३५, रा. एकता चौक, रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस नाईक जय दीपक दौंडकर (वय ३६) यांनी निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. फैजल पान शॉप व टी सेंटरवर ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तंबाखू यासह रोख रक्कम आणि मोबाईल मिळून एकूण ३६ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


शिरगावमधील हातभट्टीवर छापा
पिंपरी ः पुणे - मुंबई द्रुतगती मार्गालगत मोकळ्या जागेत गावठी हातभट्टीसाठी वापरले जाणारे पाच लाख २५ हजार रुपयांचे गुळमिश्रीत रसायन पोलिसांनी नष्ट केले. मावळ तालुक्यातील शिरगाव परिसरात मंगळवारी (ता. ५) सायंकाळी ही कारवाई करण्‍यात आली. पोलिस अंमलदार दिलीप विश्वनाथ राठोड यांनी मंगळवारी शिरगाव पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. पोलिसांनी एका महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांच्या छाप्यात १५ हजार लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन आणि ३ ताडपत्र्या सापडल्या. छापा पडणार असल्याची खबर कळताच आरोपी पळून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com