सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

सकाळ संवाद

बीआरटी बस स्टॉपवरील
सूचना फलक बदलावा
मुकाई चौक ते भक्ती शक्ती मार्गावरील बीआरटी बस स्टॉपवरील विनोदी सूचना फलक, ज्याचा अर्थ होतो की इतर वाहने जाऊ शकतात जर बीआरटी मार्गावर स्कॅनर लावले. तर इतर कुठले ही वाहन या मार्गिकेत प्रवेश करू शकणार नाही आणि उद्देश साध्य होईल.
-रवींद्र मथुरिया, सेलेस्टियल सिटी फेज २ रावेत.
PNE25V68861


बसचे वायर बॉक्सचे
झाकण बसवावे
आकुर्डी ते काळेवाडी मार्गावर धावणाऱ्या ३२२ क्रमांक विद्युत बसचे वायर बॉक्सचे झाकण सुटलेले असून कधीही पडू शकते. धोका टाळण्यासाठी झाकण व्यवस्थित बसवण्यात यावे, अशी परिवहन मंडळाला विनंती आहे
रमेश देव, चिंचवड
PNE25V68859

जिल्हा रुग्णालयासमोरील
ड्रेनेजचे झाकण बदलावे
सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील ड्रेनेजचे झाकण तुटले आहे. याठिकाणी सकाळ व संध्याकाळी
ज्येष्ठ नागरिकांसह सर्व वयोगटातील नागरिक फिरण्यासाठी, व्यायामासाठी येत असतात. नजर चुकीने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी येथील झाकण तातडीने बदलावे व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
-एक वाचक, नवी सांगवी
PNE25V68854

साने चौकातील झाड
धोकादायक स्थितीत
आकुर्डी ते चिखली दरम्यान साने चौकाच्या पुढे रस्त्याच्या अगदी मध्यभागी एक झाड धोकादायक स्थितीत उभे आहे. हे झाड वाकलेले अन् कमकुवत झालेले असून वाहतूक प्रवाहाच्या दृष्टीने मोठा अडथळा निर्माण करीत आहे. यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या मार्गावर सतत वाहतूक वाढलेली असून नागरिक, दुचाकीस्वार तसेच शालेय वाहतूक यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सदर धोकादायक झाडामुळे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून सदर झाडाची स्थिती तपासावी. आवश्यक असल्यास झाडाची छाटणी किंवा स्थलांतर करावे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर सुरक्षित वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करावी.
-निर्गुण थोरे, चऱ्होली
PNE25V68862


अपघातस्थळी गतिरोधक
असायला हवेत
अपघातांची मालिका आजही कायम आहे. रस्ते वाहतूक विभागाचे मंत्री आणि त्यांचे अभियंता नक्की कुणाच्या फायद्यासाठी आणि नक्की कुणासाठी रस्ते बांधणी करतात आणि का करतात? या धोकादायक रस्त्यावरील बेकायदेशीर असलेले रबलिंग स्ट्रीप काढून टाकून त्याठिकाणी प्रत्येक ५० मीटरवर आयआरसीच्या नियमांचे स्पीड ब्रेकर लावावेत. कारण ८०/१००आणि १२०च्या स्पीडने उतारावर आलेले कोणतेही वाहन एकदा या जीवघेण्या रबलिंग स्ट्रीपवर आल्याने (आदळल्याने) वाहन चालकांना कठीण जाते. म्हणून अचानक ब्रेक मारल्यावर वाहन आजूबाजूला सरकून अपघात होतात. आयआरसीच्या निकषांनुसार या अपघातस्थळी गतिरोधक असायला हवेत. चालकालाही आपले वाहन कंट्रोल करायला सोपे जाईल. त्यामुळे आपोआपच वाहनांचा स्पीड कमी होऊन वाहनं ३०/ २० आणि १०च्या स्पीडने जातील. हा प्रयोग करायला हरकत नाही.
-दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
-PNE25V68857

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com