‘ड्रॉप बॉक्स’ संख्या शुन्यावर आणण्यात अपयश
पिंपरी, ता. २१ : शाळांमध्ये सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शहरात दरवर्षी मोहीम राबवली जाते. त्यांना ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकणे बंधनकारक आहे. शहरात सध्या पिंपरी चिंचवड शहरात सात हजार ३३, तर जिल्ह्यात ४३ हजार १७४ विद्यार्थी ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये असल्याचे समोर आले आहे. ही संख्या शुन्यावर आणण्यास प्रशासन आणि शाळांना अपेक्षित यश मिळालेले नाही.
विद्यार्थी पुढच्या वर्गात जाताना पटसंख्या शक्यतो वाढायला हवी किंवा तीच राहायला हवी. पण, ती कमी असल्यास बाहेर पडलेले विद्यार्थी नेमके कुठे गेले, याचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून ‘मिशन ड्रॉप बॉक्स’ ही मोहीम राबवली जाते. सतत गैरहजर विद्यार्थ्याला शाळेच्या पटावरून कमी करण्यासाठी ‘स्टुडंट पोर्टल’मध्ये ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकण्याचा पर्याय आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या शुन्यावर आणण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळा आणि मुख्याध्यापकांना वारंवार दिल्या आहेत. मात्र, यात बऱ्याच अडचणी असून ते प्रत्यक्षात शक्य नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
-ड्रॉप बॉक्स’ म्हणजे...
इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व यंदा पुढील वर्गातील विद्यार्थ्यांची पटसंख्या काढली जाते.
- मागील वर्षी जेवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तेवढ्याच विद्यार्थ्यांची पटसंख्या पुढील वर्गात असणे आवश्यक आहे. मात्र, ती मागील वर्षाच्या कमी आढळल्यास कोणत्या कारणामुळे या विद्यार्थ्यांची नोंद होऊ शकली नाही, याची माहिती शिक्षण विभागाला असणे अपेक्षित आहे.
-विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला किंवा शिक्षण सोडले
-शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असेल किंवा त्याची दुबार नोंद झाली असेल किंवा त्याची चुकीची नोंद
‘ड्रॉप बॉक्स’ शुन्यावर आणताना अडचणी येत असून, यासाठी निश्चित उपाययोजना आवश्यक आहेत. विद्यार्थी इतर शाळेत प्रवेश घेईपर्यंत तो ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये दाखवू नये किंवा निश्चित महिन्यांच्या कालावधीनंतर तो काढून टाकण्याची परवानगी शिक्षण विभागाने शाळांना द्यावी. यामुळे शाळांचा ड्रॉप बॉक्स शुन्यावर आणता येणे शक्य होऊ शकेल.
- नीलेश गायकवाड, मुख्याध्यापक
परप्रांतीय आणि स्थलांतरित विद्यार्थी शाळा सोडून गेल्यावर दाखला काढून नेत नाहीत. त्यामुळे असे विद्यार्थी सहज सापडत नाहीत. तसेच त्यांना परस्पर काढून टाकता येत नाही. त्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन अडचणी समजून घेतल्या जातील. आवश्यक त्या सूचना करण्यात येतील.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग
आकडे बोलतात
तालुकास्तर - ड्रॉप आउट - ड्रॉप बॉक्स
-पिंपरी - ६३४ -२३५८
-आकुर्डी - १००१ - ४६७५
-औंध - ४ - ४३९७
-येरवडा - १४७ - ३५१४
-बिबवेवाडी - ४६ - ४७९५
-हडपसर - ३७२ -६६२६
-पुणे शहर -२८-१४४१
-आंबेगाव - १७१ -५४२
-बारामती - १ -१८८१
-भोर - ०- ३०२
-दौंड - ९ - १२७२
-हवेली - ५३ - २५४२
-जुन्नर - २६३ - १४४
-खेड - ३४ - २५६३
मावळ - ८२२ - १३७९
-मुळशी - १८० - १२०९
-पुरंदर - १८१ - ६३५
-शिरूर - ८ - १२०५
वेल्हे - ४५ - ७१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

