तळेगाव नगरपालिका

तळेगाव नगरपालिका

Published on

तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक

तळेगावमध्ये १९ जणांची बिनविरोध निवड

नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार; नऊ प्रभागांमध्ये रंगतदार लढती

तळेगाव दाभाडे, ता. २१ : तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीतील अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ३२ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपचे दहा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नऊ अशा एकूण १९ जणांनी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी महायुतीचे संतोष दाभाडे तसेच किशोर भेगडे (अपक्ष), रंजना भोसले (अपक्ष) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तसेच नगरसेवक पदासाठी नऊ प्रभागांत निवडणूक रंगणार आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत कालपर्यंत सहा जणांची बिनविरोध निवड झाली होती. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. त्यामध्ये सर्व प्रभागांतून ३२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये कालपर्यंतचे सहा आणि आज तेरा जणांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता उर्वरित नऊ प्रभागांमध्ये निवडणूक रंगणार आहे. त्यात काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत होणार आहे.

बिनविरोध झालेले प्रभाग आणि उमेदवार
प्रभाग १ अ : निखिल उल्हास भगत
प्रभाग १ ब : आशा अशोक भेगडे
प्रभाग २ ब : संदीप बाळासाहेब शेळके
प्रभाग ४ अ : सिया लक्ष्मण चिमटे
प्रभाग ४ ब : गणेश मोहनराव काकडे
प्रभाग ५ ब : संतोष मारुती भेगडे
प्रभाग ६ अ : शैलजा कैलास काळोखे
प्रभाग ६ ब : अश्विनी संतोष शेळके
प्रभाग ७ अ : स्नेहा आशिष खांडगे
प्रभाग ९ अ : सत्यम गणेश खांडगे
प्रभाग ९ ब : हेमलता चंद्रभान खळदे
प्रभाग ११ अ : कमल नामदेव टकले
प्रभाग ११ ब : इंद्रकुमार राजमल ओसवाल
प्रभाग १२ अ : सोनाली गौरव दरेकर
प्रभाग १२ ब : विनोद अशोक भेगडे
प्रभाग १३ अ : शोभा सुनील परदेशी
प्रभाग १३ ब : दीपक निवृत्ती भेगडे
प्रभाग १४ अ : सागर निर्गुण बोडके
प्रभाग १४ ब : सुरेखा नीलेश भेगडे

निवडणूक होणारे प्रभाग आणि उमेदवार
- प्रभाग २ अ ः विना कामत, ऋतुजा काळोखे, तनुजा दाभाडे, विभावरी दाभाडे
- प्रभाग ३ अ ः अनिता पवार, विना शिंदे,
- प्रभाग ३ ब ः सिद्धार्थ दाभाडे, विशाल लोखंडे
- प्रभाग ५ अ ः आरती धोत्रे, भारती धोत्रे
- प्रभाग ७ ब ः चिराग खांडगे, सूरज कदम
- प्रभाग ८ अ ः मनीषा म्हाळसकर, स्नेहल म्हाळसकर
- प्रभाग ८ ब ः अमोल शेटे, सुदाम शेळके
- प्रभाग १० अ ः मजनू नाटेकर, सचिन पवार, अरुण माने, करुणा सरोदे, स्वप्नील निकाळजे
- प्रभाग १० ब ः संगीता खळदे, सपना करंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com