उद्धट स्वभाव, उद्दाम हावभाव
पिंपरी, ता. २४ : वाहतूक नियमन, बंदोबस्त अथवा पोलिस ठाण्यात येणाऱ्या सामान्य नागरिकांचा पोलिसांशी थेट संबंध येतो. या सामान्य नागरिकांशी पोलिसांनी सौजन्याने वागणे अपेक्षित असताना असते. पण, शहरातील काही पोलिस कर्मचारी नागरिकांशी उद्धट, असंवेदनशील वर्तन करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नागरिक अडचणी मांडायला गेले, तर काही कर्मचाऱ्यांचे हावभाव उद्दामपणासारखे दिसतात. या गैरवर्तनामुळे संपूर्ण पोलिस दलाच्या प्रतिमेला तडे जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी ‘सकाळ’कडे कथन केलेले अनुभव
१. कामावरून सुटल्यानंतर गुरुवारी (ता.२०) आळंदीतील देहू फाटा येथून घराकडे जात होतो. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिस सर्वांनाच उद्धटपणे बोलत होते. यात्राकाळात स्थानिकांना आधार कार्ड किंवा कोणताही रहिवासी पुरावा बघून सोडायला हवे. एखादा नागरिक कागदपत्रे दाखवायला गेल्यास पोलिस त्यांना उद्धटपणे उत्तर देत बेदखल करत होते.
- एक नागरिक
२. कासारवाडीतील सीएनजी पंपाजवळून जात असताना एका वाहतूक पोलिसाने माझी मोटार अडवून बीआरटी मार्गिकेतून जाण्यास सांगितले. पण, तसे करणे नियमबाह्य असल्याने मी नकार दिला. त्यामुळे वाहतूक पोलिसाने मला शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. मी निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचे सांगितल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याचा उद्धटपण कमी होत नव्हता. ही खूप गंभीर बाब आहे.
- एक सेवानिवृत्त पोलिस अधिकारी
- नागरिकांची पोलिसांकडून अपेक्षा
नागरिकांशी संवाद साधताना भाषा आणि योग्य आचरण आवश्यक, याबाबत नियमित प्रशिक्षण आवश्यक
गस्तीदरम्यान किंवा तपासणीत पोलिसांनी बॉडी कॅमेरे वापरणे बंधनकारक करावे, वर्तनावर नियमित देखरेख ठेवणे
बेशिस्त वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून तत्काळ कारवाई करणे
हेल्पलाइन, ऑनलाइन पोर्टल, व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे नागरिक तक्रारी नोंदवू शकतील अशी प्रणाली असावी
जनसेवेतील उत्तम वर्तनासाठी कर्मचाऱ्यांना अभिनंदन प्रमाणपत्र, पुरस्कार देऊन सकारात्मक संस्कृती निर्माण करणे
चांगल्या पोलिसिंगचे मॉडेल उदाहरण म्हणून प्रसार करणे
प्रत्येक महिन्यात लोकसंवाद कार्यक्रम, नागरिक-पोलिस बैठका आयोजित करणे
नागरिकांनी तक्रार केल्यास त्याच्यावर दडपण येणार नाही, किंवा त्रास दिला जाऊ नये याची खात्री द्यावी
पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना आलेला अनुभव नोंदविण्यासाठी अॅप उपलब्ध आहे. पोलिसांच्या वर्तणुकीबाबत काही तक्रार आल्यास चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाते. पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागणे गरजेचे आहे. दरम्यान, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत. पोलिसांनी कागदपत्रे मागितली, अथवा इतर काही सूचना दिल्यास त्याचे पालन करावे.
- श्वेता खेडकर, पोलिस उपायुक्त, मुख्यालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

