जनजाती गौरव दिनानिमित्त स्पर्धा
(मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी)
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी मोशी यांच्या विद्यार्थी विकास विभागाने ‘जनजाती गौरव दिवस’ अर्थात भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. वक्तृत्व आणि घोषवाक्य स्पर्धा झाली. विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शिवानी भवर यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. बिरसा मुंडा सारख्या नेत्यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या. विद्यार्थ्यांनी हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत संक्षिप्त आणि प्रभावी घोषणा लिहिल्या. ज्यात आदिवासी वीरांच्या लवचीकता आणि आत्म्याला उजागर केले. घोषवाक्यांचे मूल्यांकन त्यांच्या प्रासंगिकता, सर्जनशीलता आणि परिणाम यावरून केले. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले आणि उपप्राचार्य डॉ. वृषाली तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी विकास अधिकारी स्नेहा पाटील आणि एस. एस. फरांदे यांनी संयोजन केले. गीतांजली येवला आणि लक्ष्मी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
(70323)
शिक्षकांचा सन्मान; दिनदर्शिका प्रकाशन
(एटीएसएस महाविद्यालय, पिंपरी)
मनोहर जांभेकर जयंतीनिमित्त ‘मनोहर जांभेकर शिक्षक सन्मान पुरस्कार’ आणि ‘एटीएसएस दिनदर्शिका’ प्रकाशन सोहळा एटीएसएस महाविद्यालयाने केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. दीपाली सवाई, सचिव डॉ. अश्विनी कुलकर्णी, व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ. रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. विश्वास स्वामी, आयक्यूएसी समन्वयक व संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनया केसकर, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे सदस्य डॉ. अभय कुलकर्णी आणि सुनील सवाई उपस्थित होते. डॉ. उमराणी म्हणाले, ‘‘संवेदनशील व मूल्याधिष्ठित विद्यार्थी घडवणे ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्टही यातच दडलेले आहे.’’ पिंपरी चिंचवडमधील विविध महाविद्यालयांच्या ५० पेक्षा जास्त प्राचार्यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले. किरण चव्हाण यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन श्रद्धा सामंत यांनी केले. डॉ. विनया केसकर यांनी आभार मानले.
(70322)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

