घाबरून जाऊ नका; काळजी घ्या !

घाबरून जाऊ नका; काळजी घ्या !
Published on

पिंपरी, ता. ७ ः ह्युमन मेटान्यूमोव्हायरस अर्थात एचएमपीव्ही विषाणूचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पिंपरी- चिंचवड महापालिकेनेही आपली वैद्यकीय यंत्रणा सतर्क केली आहे. महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये सज्जता करण्यात आली असून शहरातील सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णसंख्येवर (इंटिग्रेटेड डिसीज सर्विलन्स प्रोग्रॅम) आयडीएसपी सेलद्वारे महापालिका लक्ष ठेऊन आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी आणि श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कसा आहे एचएमपीव्ही विषाणू ?
- ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू
- श्वसनमार्गावरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो.
- हा एक हंगामी आजार आहे
- सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणे हिवाळा, उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो

महापालिकेचे आवाहन...
एचएमपीव्ही विषाणूच्या अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करू नये. तसेच सर्दी, खोकला, ताप लक्षणे आढळल्यास नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा. खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्यावतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

महापालिका यंत्रणा सज्ज
- महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये सज्जता
- रुग्णालयांमध्ये अधिकच्या खाटांची तरतूद
- गरज पडल्यास महापालिकेचे एक रुग्णालय एचएमपीव्हीसाठी राखीव ठेवणार
- सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची आयडीएसपी सेलद्वारे नोंद

हे करा...
- खोकला किंवा शिंका येत असतील, तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका
- साबणाने किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या
- दररोज स्वच्छ धुतलेला रुमाल वापरा

हे करू नका...
- हस्तांदोलन करणे टाळा
- टिश्यू पेपरचा पुनर्वापर करू नका
- आजारी लोकांच्या संपर्कात येणे टाळा
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका

‘एचएमपीव्ही विषाणूंचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये सज्जता ठेवण्यात आली आहे. गरज पडल्यास रुग्णांसाठी अधिक खाटाही उपलब्ध करण्याची तरतूद केली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे जाणवल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com