सरकार कस्पटे कुटुंबीयांच्या पाठीशी : फडणवीस

सरकार कस्पटे कुटुंबीयांच्या पाठीशी : फडणवीस
Published on

पिंपरी, ता. २४ ः ‘‘वैष्णवीसोबत वाईट कृत्य करणाऱ्या आरोपींना सोडणार नाही. मकोका सारख्या गंभीर कलमांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणासाठी सरकारी वकील राजेश कावेडिया यांची नेमणूक करुन हा खटला चालवण्यात येईल. काळजी करु नका हे सरकार आणि पोलिस आपल्या पाठीशी आहेत,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कस्पटे कुटुंबीयांना धीर दिला. नऊ महिन्यांचे बाळ असताना वैष्णवी आत्महत्या करू शकत नाही, असे तिच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले. तर पोलिस आणि एसआयटीमार्फत योग्य तपास सुरू आहे. आरोपींना कोणी राजकीय नेता, अधिकारी मदत करत असल्यास त्यांना सोडले जाणार नाही’ , असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (ता. २४) दिला.
वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वाकड येथे कस्पटे कुटुंबीयांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते. दरम्यान, महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे बोलणे करुन दिले. त्यावेळी फडणवीस म्हणाले, ‘‘आपल्यावर फार गंभीर परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली. वैष्णवीचा छळ करणाऱ्या लोकांना धडा शिकविल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना आपण सोडायचे नाही.’’
माझ्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या लोकांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी. हा खटला सरकारी वकील राजेश कावेडिया यांच्यामार्फत चालवावा’, अशी मागणी अनिल कस्पटे यांनी केली. त्यावर तुमच्या मागणीनुसार कायद्यात जे बसेल ते कठोर शासन केले जाईल’, असे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही सायंकाळी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. शिंदे म्हणाले, ‘‘लाडकी बहीण आणि लाडकी लेक या प्रमाणे लाडकी सून देखील व्हावी. वैष्णवीचा छळ अतिशय विकृत मानसिकतेतून झाला. पोलिस तपास योग्य दिशेने करत आहेत. मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. कस्पटे परिवाराच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ती सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. राज्यात अशा घटना घडणे अतिशय दुदैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com