

सोमाटणे, ता. २५ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’ (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीद्वारे सतत दंडात्मक कारवाई सुरू असतानाही अनेक वाहनचालक वाहतूक नियम मोडत असल्याचे चित्र कायम आहे. प्रवेशबंदी असलेल्या दुचाकी, रिक्षाही द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.
रस्तेविकास महामंडळाने ९४ किलोमीटरच्या संपूर्ण द्रुतगती मार्गावर ही संगणकीय प्रणाली बसवली आहे. या प्रणालीद्वारे प्रत्येक वाहन सीसीटीव्हीच्या नजरेखाली असून नियमभंगाची माहिती कुसगाव येथील नियंत्रण कक्षात संग्रहीत होते. ही माहिती परिवहन विभागाला पाठवली जाते आणि त्यानंतर संबंधित वाहनचालकावर दंड आकारला जातो. तरीही पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती टोलनाक्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी नसल्याने वाहनचालक बिनधास्त नियमभंग करत आहेत. यामध्ये अतिवेगाने वाहन चालवणे, प्रवेश बंदमधून वाहने घुसवणे, प्रवेश नसलेले रिक्षा, दुचाकी, ट्रॅक्टर आदी वाहनाचा वापर द्रुतगतीवर करणे, लेन कटिंग, सीट बेल्ट न वापरणे, कोठेही वाहन थांबवणे हे प्रकार सुरुच आहेत. प्रवेशबंदी असूनही पूर्वी ट्रॅक्टर व दुचाकी वापर होत होता, आता त्यात रिक्षाचालकांचाही वाढता सहभाग दिसून येत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहनचालक “दंड भरू, पण नियम मोडू” या वृत्तीने नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत.
वाहतूक प्रबोधनाची गरज
पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती नसल्याने नियमभंग वाढत असल्याने पूर्वीप्रमाणे रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांचे प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
‘‘आयटीएमएस प्रणालीमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई निश्चित आहे. याबाबत वाहनचालकांना प्रबोधन करण्यात आले असून, ही कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे.
- दीपक जोशी, पोलिस उपनिरीक्षक, महामार्ग
PNE25V17272
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.