भूमिगत वीज वायर रस्त्यावरच

भूमिगत वीज वायर रस्त्यावरच
Published on

पिंपरी, ता. १ : कामगारनगर येथे महापालिकेच्या कारभारामुळे भटक्या श्‍वानांना विजेचा धक्का लागून प्राण गमवावे लागले. मात्र, त्यानंतरही महावितरण आणि महापालिकेने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याउलट पिंपरीगावात खोदकामामुळे भूमिगत वीज वायर रस्त्यावर पडल्या आहेत. बाजूलाच महावितरणचा डीपी उघडाच ठेवण्यात आला आहे.

कामगारनगर-खराळवाडी आणि संत तुकारामनगर येथे घडलेल्या दोन घटनांमध्ये पाच भटक्या श्‍वानांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एमएनजीएल गॅस पाइपलाइनच्या कामासाठी खराळवाडी येथे रस्त्यालगत खड्डे खोदण्यात आले. कोणत्याही सुरक्षाव्यवस्थेचा अभाव, सूचना फलक किंवा अडथळ्यांचा वापर न केल्याने जोरदार पावसानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचले. या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने भटक्या श्वानांचा मृत्यू झाला. कारण जोपर्यंत एखादी मोठी घटना घडत नाही. तोपर्यंत प्रशासन जागे होत नाही,विशेष म्हणजे इथे दररोज अपघात होत आहे. तरी ही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.

महापालिकेचे खोदकाम सुरू होते. तेथे भटक्या श्‍वानांचा मृत्यू झाला आहे. सध्या तपासणी सुरू आहे. जबाब घेण्यात येत आहेत. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.
-संजय खाबडे, विद्युत विभाग

पिंपरी येथील तपोवन मंदिरासमोर गेल्या चार महिन्यांत खोदकाम करुन ठेवले आहे. आता एखादी घटना घडायची महावितरण ही वाट पाहात आहे का? नागरिकांनी बऱ्याच तक्रारी दिल्या, पण उपयोग नाही. महापालिकेच्या विद्युत विभागावर कायदेशीर कारवाई करावी.
- सचिन जाधव, संचालक, हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशन.

PNE25V18133

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com