

पिंपरी, ता. ३१ : ‘‘सर्वच क्षेत्रात ‘एआय’चा वापर होत आहे. त्यामुळे ‘एआय’ आणि ब्लॉक चेन यामधील नव्या संधी तरूणांना खुणावत आहेत.’’, असे मत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे प्रा. डॉ राहुल सोनकांबळे यांनी व्यक्त केले.
सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
त्यांनी विद्यार्थ्यांना ‘एआय’ आणि ब्लॉक चेनमधील करिअर संधी, त्यांना मिळणारे पॅकेजेस याबाबत माहिती दिली. ‘एआय’मध्येही स्पेशलायझेशन असून देशासह विदेशात कोणकोणत्या कोर्सेसला विशेष महत्व आहे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ‘एआय’ आणि ब्लॉक चेन या वेगवेगळ्या शाखा असल्या तरी या दोन्ही शााखा एकत्र करून सुरू झालेल्या कोर्सेसबाबत त्यांनी मागदर्शन केले. साधारण: दोन ते तीन वर्षांच्या अनुभवी विद्यार्थ्यांना नऊ ते अठरा लाखांपर्यंतचे पॅकेज मिळत आहे. यामधील स्किल्स आणि टूल्स यांचा वापर करून विद्यार्थी आपले करिअर उत्तमरीत्या घडवू शकतात. असेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.