नीलेश चव्हाणच्या घराची झडती; सासू, दीर, नणंदेचा मोबाईल जप्त

नीलेश चव्हाणच्या घराची झडती; सासू, दीर, नणंदेचा मोबाईल जप्त
Published on

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
पिंपरी, ता. ३१ : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या नीलेश रामचंद्र चव्हाण (रा. कर्वेनगर, पुणे) याच्या घरातून बावधन पोलिसांनी शनिवारी (ता. ३१) वैष्णवी हगवणे यांची सासू लता हगवणे, दीर शशांक हगवणे व नणंद करिष्मा हगवणे यांचे एकेक मोबाईल जप्त केले. तसेच नीलेश याचा पिस्तूल परवाना व पासपोर्टही जप्त केला आहे.
या आत्महत्या प्रकरणातील आरोपी लता, शशांक व करिष्मा यांचे मोबाईल नीलेश याच्याकडे असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर नीलेश पसार झाला होता. दरम्यान, नीलेश याला शुक्रवारी (ता. ३०) नेपाळ येथून अटक करून शनिवारी (ता. ३१) न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे बावधन पोलिसांनी चव्हाण याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये तीन मोबाईल, पासपोर्ट व शस्त्र परवाना पोलिसांच्या हाती लागला. या मोबाईलमधून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com