सत्तेचा वापर सामान्यांसाठी करणारे शंकरराव पाटील : भावे
पिंपरी, ता.१३ ः ‘‘संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मी जवळून बघितली आहे. सत्ता नेमकी तुम्ही कोणासाठी वापरताय? सत्तेचा वापर सामान्यांसाठी करावा, असा विचार शंकरराव करत होते म्हणून त्यांना ‘भाऊ’ म्हणत.’, असे गौरवोद्गार राजकीय घडामोडीचे विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी शनिवारी (ता.१३) काढले.
निगडी प्राधिकरण येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) सभागृहात स्व. शंकरराव उर्फ भाऊ पाटील यांच्या १९ व्या स्मृतीदिनानिमित्त ‘कै. शंकरराव पाटील उर्फ भाऊंचे महाराष्ट्राच्या जडण घडणीतील योगदान’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, पीसीयू नियामक मंडळाचे सदस्य सचिन ईटकर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई उपस्थित होते.
भावे म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाण यांच्या सारखे पहिले मुख्यमंत्री आपल्याला लाभले हे आपले भाग्य होते म्हणूनच आज महाराष्ट्राची एवढी प्रगती झाली. १९६० ते १९८० या २० वर्षांतच महाराष्ट्राची खरी बांधणी झाली.’’
पुढील वर्षी पुस्तक
भावे म्हणाले, ‘‘शंकरराव पाटील यांच्या ७५०० पानांच्या भाषणांची माहिती विधान भवनात उपलब्ध आहे. सलग सहावेळा शंकरराव पाटील निवडून आले. एवढे मोठे मंत्री असतानाही त्यांच्यावर एकही आरोप झाला नाही. चारित्र्य म्हणजे काय असते ? हे शंकरराव पाटील यांच्याकडे पाहिल्यावर समजते. सहकारी साखर कारखान्यांमध्ये कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करून कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. माथाडी कामगारांसाठी आदर्श सेवा नियमावली तयार करून आर्थिक न्याय मिळवून दिला. पुढच्यावर्षी १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत ‘कै. शंकरराव पाटील उर्फ भाऊ’ पुस्तक तयार होईल.’
सचिव विठ्ठल काळभोर म्हणाले, ‘‘इंदापूर येथील आयटीआय, पिंपरी चिंचवड येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवाजी शिक्षण संस्था अशा अनेक संस्थांची स्थापना करून शंकरराव पाटील यांनी विविध क्षेत्रांत भर घातली. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले.’’
माधुरी ढमाले यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.