पिंपरी-चिंचवड
चिखलामुळे अनेक दुचाकीचालक घसरून पडले (फोटो फिचर)
चिखलामुळे घसरगुंडी
दुभाजकात टाकलेली माती रस्त्यावर पडली असताना शनिवारी दुपारी पाऊस होऊन तिथे चिखल झाला. त्याचा अंदाज न आल्याने सुमारे १५ हून अधिक दुचाकी चालक घसरून पडले. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चिंचवडहून खराळवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर ग्रेड सेपरेटरमध्ये झाली. रस्त्याच्या कडेने झालेल्या चिखलामुळे दुचाकी चालक जोरात घसरून पडले. नशीब बलवत्तर म्हणून कुठलीही जीवितहानी झाली नाही. यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच महापालिकेचे कर्मचारी फावडे घेऊन चिखल काढताना दिसले. त्याने ग्रेड सेपेरेटरमध्ये वाहतूक कोंडी झाली.