स्वामी विवेकानंदांच्या कार्याला उजाळा
प्रा. रेखा भालेराव (मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी)
शिकागो सर्वधर्म परिषदेला १३२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी येथे स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम झाला. स्वामी विवेकानंद यांची भाषणे व पुस्तकांचे वाचन झाले. ‘स्वामी विवेकानंद आणि युवक’ विषयावर वक्तृत्व स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांनी शिकागो धर्म परिषदेतील स्वामी विवेकानंद यांनी दिलेली भाषणे उत्साहाने वाचली. विवेकानंदांनी दिलेले कर्मसिद्धांत, आत्मा व सार्वभौम बंधुभाव यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरील विचार अनुभवले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. रेखा भालेराव व एनएसएस इनचार्ज प्राची दुसाने यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले व उपप्राचार्या डॉ. वृषाली तांबे उपस्थित होते. स्नेहा पाटील यांच्यासह सानिका व अस्मिता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ईश्वरी सुकाळे, शिवानी भवर व वैष्णवी मघळे यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. केशव घनवट व प्रवीण पाटोळे यांनी सहकार्य केले. एनएसएस स्वयंसेवकांनी संयोजन केले.
विद्यार्थ्यांसाठी ‘अविष्कार’
मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी मोशी येथे ‘अविष्कार स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन’ विषयावर डॉ. रवींद्र बढे यांनी मार्गदर्शन केले. कृषी, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य व मानवशास्त्र या विविध क्षेत्रांतील संशोधन, नावीन्य व शोध यांबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्राजक्ता कोठावडे (एसपीपीयू समन्वयक) यांनी संयोजन केले. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्या डॉ. वृशाली तांबे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. केतकी साळवे यांनी आभार मानले. तांत्रिक व्यवस्थेसाठी प्रवीण पाटोळे व नवनाथ यांनी सहकार्य केले.
‘दिशारंभ’तून विद्यार्थ्यांचे स्वागत
- नेहा वडगावे (आयआयसीएमआर)
‘आयआयसीएमआर’मध्ये एमबीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ‘दिशारंभ ः उन्नती, चिंतन, यश’ कार्यक्रमात उत्साहात स्वागत झाले. संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण आणि करिअर घडविण्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. गणेश खमगल (संचालक, मिटकॉन फोरम) यांनी ‘नेतृत्वगुण’, रिनू राजेश (कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ) यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि वैशाली खेडकर (प्रशिक्षक) यांनी ‘लैंगिक संवेदनशीलता व महिला संरक्षण कायदा’ याविषयी मार्गदर्शन केले. ‘चाय पे चर्चा’ सत्रात माजी विद्यार्थी विशाल कुलकर्णी, अनुश्री जगताप व अषीमा शर्मा यांनी त्यांचे अनुभव सांगितले. दीप्ती बाजपई व शीतल माने यांनी समन्वय साधला. शादाब हुसेन (एआयसी पिनॅकल) यांनी ‘उद्योजकता, नावीन्य, सर्जनशीलता आणि व्यवहार्यता’ विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. पूजा गवांदे उपस्थित होत्या. अनाग्राम टेस्टमधून विद्यार्थ्यांची भाषिक जाण, विचारशक्ती व त्वरित निर्णयक्षमता तपासली. जेंडर चॅम्पियन अॅक्टिव्हिटीमधून विद्यार्थ्यांना लिंग समानतेविषयी जागरूकता व नेतृत्वगुण विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सरिता सॅमसन यांनी संयोजन केले. तसेच, संवाद कौशल्य, ईआरपी प्रशिक्षण, झुंबा आणि व्यक्तिमत्त्व विकास विषयांवर कार्यशाळा झाली. ‘ज्ञानदूत’चे (परिचय पुस्तिका) प्रकाशन झाले. मिटकॉन सोल्युशन्स संस्थेसोबत सामंजस्य करार झाला. परिचय सोहळ्याचे समन्वयक डॉ. राजेंद्र आगवणे आणि रूपाली मोडक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.