अभियांत्रिकीच्या अविष्कारांतून खुलतेय उद्योगनरीचे सौंदर्य
अभियांत्रिकी दिन विशेष : लोगो
पिंपरी, ता. १४ : राहण्यायोग्य शहरासाठी (लिव्हेबल सिटी) महापालिका विविध प्रकल्प राबवित आहे. त्यात मेट्रो, स्मार्ट सिटी, उद्याने, रस्ते, इमारती आदींचा समावेश आहे. यातून अभियांत्रिकीच्या विविध शाखांचा अविष्कार पाहायला मिळत आहे. शिवाय, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रकल्प अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरत असून शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
गावागावांचे बनलेली पिंपरी चिंचवड ‘उद्योगनगरी’ स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी होण्यसह आधुनिकतेकडेही झेपावत आहे. या सेवा-सुविधांचे प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे जणू प्रदर्शनच आहे. यामध्ये रस्ते, नदीवरील पूल व उड्डाणपूल (स्थापत्य अभियांत्रिकी), मेट्रो संचालन (मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य, विद्युत, संगणक अभियांत्रिकी), पाणीपुरवठा व जलनिःसारण (स्काडा प्रणाली, स्मार्ट मीटर, पाणी वितरण व्यवस्था : स्थापत्य, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स, पर्यावरण अभियांत्रिकी) आदींचा समावेश आहे.
अभियांत्रिकीच्या पाऊलखुणा
- मेट्रो मार्ग (एलिव्हेटेड व भुयारी मार्ग, ऑटोमोबाठल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, स्थापत्य, संगणक)
- वास्तूरचना (पीएमआरडीए इमारती प्राधिकरण आणि चिंचवड स्टेशन परिसरात सुरू असलेले महापालिकेच्या इमारतीचे इकोफ्रेंडली बांधकाम, नाट्यगृह)
- उड्डाणपूल (नाशिक फाटा दुमजली उड्डाणपूल, भक्तीशक्ती चौक निगडीतील तीन मजली उड्डाणपूल
- नदीवरील पूल (पवना नदीवरील रावेत येथील संत तुकाराम महाराज पूल (बास्केट पूल), थेरगाव व चिंचवडगाव जोडणारा फुलपाखरू (बटरफ्लाय) पूल
- शिल्प (भक्तीशक्ती, वडमुखवाडीतील संत भेट व अन्य चौकात व उद्यानांत उभारलेले विविध शिल्पे)
- रस्ते (मुंबई-पुणे महामार्ग ग्रेडसेपरेटर, मुख्य मार्ग, सेवा रस्ता; डांगे चौक, साई चौक, सुदर्शननगर ग्रेडसेपरेटर)
- रोषणाई (विविध पुलांना विद्युत रोषणाई, पथदिव्यांचे खांब व दिव्यांची रचना वेगवेगळ्या आकारातील)
- अर्बन स्ट्रीट (अर्बन स्ट्रीट प्रकल्पाअंतर्गत पदपथांची निर्मिती, सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग, वाहनतळ, वृक्षारोपण, आसनव्यवस्था आदी)
- पाणीपुरवठा (स्काडा प्रणाली, स्मार्ट मीटर, पाणी वितरण नियंत्रण प्रणाली)
- वैद्यकीय (हवेपासून ऑक्सिजन निर्मिती नवीन थेरगाव रुग्णालयातील प्रकल्प)
- हरित सेतू (निगडी व आकुर्डी प्राधिकरणात सुरू असलेला हरित सेतू प्रकल्प)
- विविध प्रणाली (हवा शुद्धीकरण प्रणाली, ड्रायमिस्ट फाउंडन, यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई)
- अन्य प्रकल्प (वेस्ट टू एनर्जी, प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती, राडारोड्यापासून बांधकाम साहित्य निर्मिती)
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी नावीन्यपूर्व प्रकल्प महापालिका साकारत आहे. यामध्ये उड्डाणपूल, नदीवरील पूल, सुसज्ज रस्ते; रुग्णालये, शाळांसह विविध इमारतींचा समावेश आहे.
- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.