नागरिकांनी सुचविले ५,१०२ विकासकामे

नागरिकांनी सुचविले ५,१०२ विकासकामे

Published on

पिंपरी, ता. १७ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अर्थसंकल्पात नागरी सहभाग’ उपक्रमाला नागरिकांकडून विक्रमी प्रतिसाद मिळाला. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पासाठी तब्बल पाच हजार १०२ नागरिकांनी अभिप्राय नोंदविला आहे. गेल्या वर्षी दोन हजार २७९ नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले होते.
महापालिकेने १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ‘अर्थसंकल्पात नागरी सहभाग’ उपक्रम राबविला. शहरातील सर्व आठ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील रहिवाशांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सर्वाधिक एक हजार १६१ अभिप्राय प्राप्त झाले आहेत. नागरिकांनी सुचवलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के निधीची तरतूद केली जाते. यामध्ये रस्ते विकास, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा सुधारणा, उद्याने, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि सार्वजनिक सोयीसुविधा यांचा समावेश असतो.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय
नागरिकांचे अभिप्राय
कार्यालय / अभिप्राय
अ / ६३५
ब / ७५५
क / ५७८
ड / ११६१
ई / ५७९
ग / ४८८
ह / ४१४
फ / ४९२

नागरिकांनी सूचविलेली कामे
कामे / संख्या
रस्ते / १,२६५
कचरा व्यवस्थापन / ५९८
पाणीपुरवठा / ४५८
उद्याने, मैदाने / ४०४
पावसाळी पाण्याचा निचरा / ३०७
सार्वजनिक स्वच्छतागृह / ३०३

अर्थसंकल्पात नागरी सहभाग उपक्रमामध्ये पाच हजारांहून अधिक नागरिकाचा प्रतिसाद मिळणे, हे पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या नागरी सहभागाचे प्रतीक आहे. नागरिकांच्या या सूचनांमुळे २०२६-२७ चा अर्थसंकल्प अधिक प्रतिसादक्षम आणि समावेशक तयार करण्यास मदत होईल. नागरिकांच्या सूचनांचे तांत्रिक परीक्षण करून त्यानंतर मंजूर कामांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. त्यांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात येईल.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com