आता एक इंचही जमीन देणार नाही
सोमाटणे, ता. १८ ः पवन मावळच्या पूर्व भागातील नेरे, सांगवडे, दारुंब्रे, गोडुंब्रे, साळुंब्रे आणि धामणे या सहा गावांतील शेतकऱ्यांनी रिंगरोड आणि टीपी योजना कायमची रद्द करण्याचा जोरदार इशारा दिला आहे. जर या योजनेवर माघार घेतली नाही तर ते तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी व्यक्त केला आहे.
पीएमआरडीने कोणालाही माहिती न देता या गावातून ६६ मीटर रुंदीचा रिंगरोड आणि टीपी योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकल्पामुळे एकूण २४४२ एकर शेती जमीन नष्ट होणार आहे. सांगवडे गावातील ३१९ एकर ३२ आर, दारुंब्रे गावातील ३२५ एकर ८ आर, साळुंब्रे गावातील २६८ एकर ३५ आर, धामणे गावातील ५२४ एकर १२ आर, गोडुंब्रे गावातील २९८ एकर २५ आर आणि नेरे गावातील ३०९ एकर २७ आर अशी जमीन या योजनेअंतर्गत येत आहे.
या सहा गावातील लोकांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन शेती आहे. जर हा प्रकल्प मंजूर झाला, तर शेतकरी भूमिहीन होतील आणि त्यांना उपाशी राहावे लागेल. यामुळे पवन मावळ भागातील विकास प्रलंबित राहील आणि गावांचे अस्तित्वच धोक्यात येईल.
शेतकऱ्यांनी यापुढे स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते, कारण त्यांचे आर्थिक व्यवस्थापन शेतीवर आधारित आहे. तसेच, स्थानिक संत तुकाराम सहकारी कारखाना ज्याला ऊस उत्पादनावर अवलंबून आहे, तोही या योजनेमुळे बंद पडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे बांधकाम व्यवसायींनाही मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेती संपुष्टात येईल. परिणामी, गावांचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते.
या सहा गावातील एकही इंच जमीन आम्ही या योजनेला देणार नाही. सरकारने या प्रकल्पासाठी इतर पर्याय शोधावे. जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर प्राण गमावण्याचीही वेळ आली तरी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शेतकरी कृती समितीचे सदस्य संभाजी राक्षे, रमेश राक्षे, भिवाजी राक्षे, सुनील राक्षे, भरत लिमण, बाबासाहेब बुचडे, किरण राक्षे, सागर राक्षे, पोपट राक्षे, कैलास मोकाशी, अंकुश राक्षे, विजय लिमण, तुषार मोकाशी, शेखर राक्षे, दशरथ राक्षे, रोहन जगताप, भोलेनाथ मोकाशी आणि नीलेश लिमण यांनी भूमिका मांडली.
फोटो
सांगवडे ः मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी कृती समितीसह ग्रामस्थ उपस्थित.
Smt19Sf1.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.