‘ईएसआय’ योजनेपासून कामगार दूरच
‘ईएसआय’चे दुखणे
अमोल शित्रे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ : पिंपरी चिंचवडसह लगतच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लाखो कामगारांसाठी राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) योजना राबविल्या जातात. या योजनांतर्गत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सुविधा, औषधे, शस्त्रक्रिया, मातृत्व सेवा, अपघात विमा आणि गंभीर आजारांवरील उपचार केले जातात. त्यामुळे सुविधा आणि आरोग्य संरक्षण मिळते. त्याचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कामगाराने योजना समजून घेणे आवश्यक आहे.
कामगारांना ‘ईएसआयसी’ योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. कामगार कार्यरत असतो, ती कंपनी त्याची या योजनेत नोंदणी करते. त्यानंतर कामगाराला ‘ईएसआय’ कार्ड किंवा तात्पुरता ओळख क्रमांक दिला जातो. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी हे कार्ड किंवा ओळखपत्र दाखवावे लागते. त्यानंतरच वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ कायमस्वरुपी मिळावा, यासाठी कामगाराच्या पगारातून ठराविक टक्केवारीने हप्ता कपात केला जातो. हा हप्ता कर्मचारी आणि नियोक्ता दोघांकडून जमा केला जातो. वेळोवेळी हे हप्ते भरले गेले, तरच योजना लागू राहते.
‘ईएसआय’ योजनेअंतर्गत कामगार आणि त्याच्या कुटुंबीयांना नोंदणीकृत ईएसआय रुग्णालयात किंवा अधिकृत हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय मिळते. म्हणूनच, प्रत्येक कामगाराने या योजनांची माहिती समजून घेऊन योग्यवेळी नोंदणी करणे आणि सुविधांचा लाभ घेणे आवश्यक आहे. बहुतांश कामगारांना योजनांची माहिती मिळत नाही. कामगारही ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. यामध्ये कामगारांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचेही नुकसान होते. तथापि, अनेक लघु-मध्यम उद्योग व व्यापारी नियमांचे उल्लंघन करून निधी जमा करत नाहीत. यामुळे अनेक कामगार हक्काच्या सुविधा मिळवण्यात मागे पडत असल्याची स्थिती आहे.
इतर महत्त्वाच्या योजना
- विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत आरोग्यसेवा
- आजारपणामुळे काम करता न आल्यास ठराविक कालावधीपर्यंत वेतनातील आर्थिक मदत
- महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर आर्थिक मदत
- काम करताना अपघात दिव्यांगत्व आल्यास नियमित आर्थिक मदत
- कामावर मृत्यू झाल्यास आश्रितांना पेन्शन
- कारखाना बंद, नोकर कपात किंवा अपंगत्वामुळे नोकरी गमावल्यास आर्थिक मदत
- दिव्यांग कामगारांसाठी पुनर्वसन व प्रशिक्षणाची सोय
ईएसआय रुग्णालसातील आरोग्य सेवा
सामान्य शस्त्रक्रिया, ईएनटी सर्जरी, नेत्ररोग शस्त्रक्रिया, स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूती शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया, सर्जिकल गॅस्ट्रो एन्टरोलॉजी, हृदयरोग आणि हृदयरोग शस्त्रक्रिया, बालरोग शस्त्रक्रिया, जननेंद्रियाची प्रणाली, न्यूरोसर्जरी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, प्लॅस्टिक सर्जरी, जळणे, बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन यासह इतर सर्व
काही कंपन्या प्रतिसाद देत नाहीत. आरोग्य शिबिर घेणे आणि कामगारांना योजना समजवून सांगण्याची अडचण होते. तसेच, उद्योग व व्यावसाय क्षेत्रात ‘ईएसआय’पोटी भरावे लागणारे पैसे वाचवण्यासाठी पळवाटा शोधल्या जातात. कामगारांनी योजनेसाठी हट्ट धरल्यास त्यांना कमी केले जाते. हे सर्वत्र घडत असल्यामुळे कामगार समोर येण्यास घाबरतात. तरी, ईएसआय नोंदणीकृत कामगारांनी योग्य उपचार घेण्यासाठी ईएसआय रुग्णालयात नियमित यावे.
- डॉ. वर्षा सुपे, चिकित्सा अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर
शहरातील दहापेक्षा अधिक कामगारांच्या आस्थापना
वाणिज्य : ६०,७००
औद्योगिक : ४,७००
बांधकाम प्रकल्प : ५,५००
हॉटेल्स : ३५०
रेस्टॉरंट :१५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.