दर्जेदार सुविधा असूनही कमी रुग्णांना उपयोग
ईएसआयचे दुखणे
पिंपरी, ता. २० ः मोहननगर येथील कामगार विमा रुग्णालयात (ईएसआय हॉस्पिटल) पायाभूत सुविधा उत्तम असूनही अनेक रुग्णांना उपयोग होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तुलनेने महापालिकेच्या रुग्णालयांत जास्त रुग्ण उपचार घेत असल्याचे आकडेवारी सांगते. यात ईएसआय लाभार्थी कामगारांचाही समावेश आहे.
शहराची लोकसंख्या आता ३० लाखांच्या घरात पोहोचली आहे. यात कामगार वर्गाची संख्या लक्षणीय आहे. रोजगाराच्या शोधात शहरी, ग्रामीण तसेच परराज्यांतूनही नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. त्यांना आवश्यक सुविधा देणे प्रशासनाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. महापालिकेने यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह सहा प्रमुख रुग्णालये सुरू केली आहेत. तेथे बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि आंतररुग्ण (आयपीडी) या दोन्ही विभागांत वेगवेगळ्या भागांतील रुग्ण उपचार घेतात. पालिकेची रुग्णालये संख्येने जास्त आहेत. ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. त्यामुळे ईएसआय रुग्णालयांच्या तुलनेत कामगार पालिका रुग्णालयांत जाण्यास प्राधान्य देत आहेत.
----------
वर्षनिहाय रुग्णसंख्या
थेरगाव रुग्णालय
वर्ष/ओपीडी/आयपीडी
२०२१-२२/३८२६१/२१९३
२०२२-२३/२०१२७०/१०५५४
२०२३-२४/३०६९२९/१९२५७
२०२४-२५/३३३९६४/२३३४७
---
नवीन भोसरी रुग्णालय
वर्ष/ओपीडी/आयपीडी
२०२१-२२/६१८८०/१८५०
२०२२-२३/११६०९१/६३८९
२०२३-२४/१५२८४२/७२१६
२०२४-२५/१५९४१४/८५६६
---
आकुर्डी रुग्णालय
वर्ष/ओपीडी /आयपीडी
२०२१-२२/४५१५६ /४०३४
२०२२-२३/११८०२३/५९२६
२०२३-२४/१५२७५५/७११३
२०२४-२५/१८२८६७/८५४८
---
कामगार रुग्णालय (ईएसआय)
वर्ष/ओपीडी/आयपीडी
२०२१-२२/६८१५६/१०९९३
२०२२-२३/९५२९८/१११९६
२०२३-२४/१३९२२३/१७००२
२०२४-२५/१३०००५/१०५४०
--------
रुग्णवाढीसाठी हे उपाय करावेत
- कंपनी, औद्योगिक वसाहती, लेबर कॅम्प, मजूर अड्डे अशा ठिकाणी आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णालयातील सुविधांची माहिती देणे
- पत्रके, फलक, सोशल मीडिया, स्थानिक वृत्तपत्रे या माध्यमांतून माहिती देणे
- दुर्गम भागांतील कामगारांसाठी फिरता दवाखाना सुरू करणे
- तपासणीनंतर गंभीर रुग्णांना थेट ईएसआय रुग्णालयात पाठवणे
- तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवणे
- अत्याधुनिक चाचण्यांची (सीटी स्कॅन, एमआरआय, ब्लड टेस्ट आदी) सुविधा उपलब्ध करणे
- औद्योगिक कंपन्यांशी करार करून त्यांच्या कामगारांची वार्षिक आरोग्य तपासणी ईएसआय रुग्णालयात करणे
- कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यास कंपन्यांशी समन्वय ठेवणे
- रुग्णांसाठी सोपी नोंदणी व हेल्पडेस्क सुरू करणे. रुग्णालयातील औषधसाठा पुरेसा ठेवणे
- स्वच्छता, सुरक्षा व आहार अशा सुविधा उत्तम ठेवणे
- कामगारांच्या उपचारांचा चांगला अनुभव समाजमाध्यमांवर शेअर करणे
- औद्योगिक क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी पाठवून थेट संवाद साधणे
------
रुग्णालयात दर्जेदार सुविधा दिल्या जातात. लोकसंख्या वाढीचा विचार करून शहराच्या वेगवेगळ्या भागांत रुग्णालयांची संख्या वाढवली आहे. आता त्याही रुग्णालयात लाखो रुग्णालय उपचार घेतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार केले जात असल्यामुळे शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील रुग्णांना सुद्धा पालिकेची रुग्णालये आपली रुग्णालये वाटू लागली आहेत.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
----
रुग्णालयात त्रिस्तरीय उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. प्राथमिक निदान, तज्ज्ञांकरवी उपचार आणि आजाराच्या तीव्रतेनुसार शस्त्रक्रियेबाबत निर्णयप्रक्रिया असे याचे स्वरूप आहे. पुढील काही दिवसांत आणखी नव्या सुविधा सुरु करण्यात येतील. तसेच, ग्रामीण भागातील कामगारांना वेळेत येण्या-जाण्याची सोय नसते. कामाच्या ठिकाणावरून रुग्णालय दूर पडत असल्याने ते येण्यास टाळाटाळ करतात. त्यांच्या येण्या-जाण्याची सोय होणे अपेक्षित आहे. अधिकाधिक गरजू रुग्णांना उपचार घेता यावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
- डॉ. वर्षा सुपे, चिकित्सा अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.