पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह
(मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निक)
मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निकमध्ये सियॉन समिट ऑटोमोटिव्ह पुणे यांच्या सहकार्याने ‘पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह’ झाला. यात ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना करिअरची संधी मिळाली. मुलाखत पॅनलमध्ये मानव संसाधन आणि आयआरचे व्यवस्थापक अब्दुल रहीम शेख, पेंट शॉप व्यवस्थापक सदाम बेग व मटेरियल व्यवस्थापक अमित सरमणे यांचा समावेश होता. कंपनीचे कामकाज, संस्कृती आणि वाढीच्या शक्यतांवर सादरीकरण केले. भरती प्रक्रियेत लेखी मूल्यांकन, तांत्रिक मुलाखती आणि एचआर फेऱ्यांचा समावेश होता. ‘पूल कॅम्पस उपक्रमाद्वारे विविध पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट मिळवली असून ही मोहीम उत्कृष्टता, सहकार्य आणि विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधींसाठी तयार करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे पॉलिटेक्निकच्या प्राचार्या गीता जोशी यांनी सांगितले. १८ विद्यार्थ्यांची निवड केल्याचे मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निकचे प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी गणेश म्हाळंकर यांनी घोषित केले. संस्थेचे कार्याध्यक्ष बी. जी.जाधव यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
(51872)
--
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’
(एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी)
एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्विक हील फाउंडेशनच्या सहकार्याने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ जनजागृतीपर कार्यक्रम झाला. प्रा. अमित ताले आणि क्विक हीलचे अजय शिरके यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या पथनाट्याने प्रारंभ झाला. यात फिशिंग, ऑनलाइन फसवणूक आणि मजबूत पासवर्डचे महत्त्व यांसारख्या विविध सायबर धोक्यांबद्दल माहिती दिली. सायबर धोके कसे ओळखावे, वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित ठेवावी आणि इंटरनेटचा जबाबदारीने कसा वापर करावा? याबाबत माहिती दिली. ‘‘आज सायबर जागरूकता ही गरज बनली आहे,’’ असे एमआयटी एसीएससीचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी सांगितले. सहसंचालिका डॉ. अक्षदा कुलकर्णी यांनी आभार मानले.
(51871)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.