सकाळ संवाद
काटे चौकातील कचरा उचला
पिंपळे गुरव येथील एम. एस. काटे चौकात बेजबाबदार नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा फेकत असून कायमचा कचरा साचलेला असतो. पावसामुळे येथे दुर्गंधी सुटलेली असते. तेथून विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील नागरिक ये-जा करीत असतात. मात्र, त्यांना नाकाला रुमाल लावून चौक ओलांडावा लागतो. कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरांचा वावर असतो. ही जनावरे कचरा अस्ताव्यस्त पसरवितात. पादचाऱ्यांना भीत भीतच चौकापलीकडे जावे लागते. आरोग्य विभागाने तातडीने याठिकाणी लक्ष द्यावे.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V52061
पथदर्शक फलकावरील बॅनर हटवा
पिंपरीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील पथदर्शक फलकावर हा बॅनर लागला आहे. येथे नेहमी बॅनर लावलेले असतात. पण, महापालिकेकडून काहीही कारवाई होत नाही. दहीहंडी होऊन महिना होऊन गेला तरी ते अजूनही तसाच बॅनर आहे.
- विशाल पोतदार, पिंपळे गुरव
PNE25V52059
देहूरोड येथील छेदरस्ता बंद करा
पुणे - बेंगळुरु महामार्गावर देहूरोड येथील शिंदे पेट्रोल पंपासमोरील दुभाजक तोडून बेकायदा छेद केल्याने दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहने धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडत आहेत. या ठिकाणी मोठा अपघात अथवा मोठी दुर्घटना होऊ शकते. आयआरबी प्रशासनाने इथे उंचीवर बॅरिकेड लावून रस्ता बंद करावा.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
PNE25V52058
उद्यानात कचऱ्याचे ढीग
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक आणि रस्त्यावरील कचऱ्याचे डस्टबिन हे बट्टूराव जगताप उद्यानात एका कोपऱ्यात टाकले आहे. शहरातील कचरा उचलला जात नसल्याने एकीकडे शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असताना आता बट्टूराव जगताप उद्यानात अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
- सिद्धार्थ गोरे, पिंपळे गुरव
PNE25V52063
गटाराचे पाणी रस्त्यावर
जुनी सांगवी येथील पवारनगर गल्ली क्र. २ मध्ये गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत असून त्याची दखल गेल्या एक महिन्यापासून कोणीही घेत नाही. सांडपाणी वाहिनी तुटल्याने, तुंबल्याने किंवा खराब जलनिस्सारण वाहिन्यांमुळे गटारामधून घाणपाणी बाहेर येऊ शकते. त्याने परिसर अस्वच्छ होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
PNE25V52062
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.