सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

रस्त्याची प्रलंबित कामे पूर्ण करा
गेल्या काही महिन्यांपासून कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळील शंकरवाडीतील भारतरत्न रतन टाटा उड्डाणपुलाच्या रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट स्थितीत आहे. सांडपाणी वाहिन्या, पावसाळी वाहिन्या, पदपथ ही कामे सुद्धा अपूर्ण आहेत. स्थापत्य विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. कच्च्या रस्त्यावरून जाताना अनेकदा वाहने घसरुन छोटे मोठे अपघात वारंवार घडत आहेत. इथे गतिरोधक किंवा थ्रर्मोप्लास्ट रम्बलरचे पांढरे पट्टे तातडीने मारावेत तसेच आजूबाजूला पडलेला राडारोडा व वाढलेले गवत काढावे.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V52646


डीपीवर झाकण बसवा
चिंचवडमधील थरमॅक्स चौक येथे बसविण्यात आलेल्या महावितरणच्या डीपीवर झाकण नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याने पादचारी तसेच वाहनधारक यांच्या जिवाला व मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात किंवा ओलसर हवामानात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता अधिक आहे म्हणून त्वरित डीपीवर झाकण बसवावे.
- निर्गुण थोरे, थरमॅक्स चौक, चिंचवड
NE25V52645


वाकड फाट्यावर अपघाताची भीती
औंध - चिंचवड रस्त्यावरील वाकड फाट्यावर उजव्या बाजूला पदपथावर मोठा खड्डा पडलेला आहे. सकाळी फिरण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी तो अडचणीचा व धोकादायक आहे. एक-दोन दिवसांच्या पावसामुळे रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे. अनेक खड्डे पडले आहेत. प्रशासनाने दखल घेऊन तातडीने खड्डे दुरुस्त करावेत. खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
- बी. बी. पडवळ, चिंचवड
PNE25V52644

पोलिसांकडूनच नियमांचे उल्लंघन
सध्या पोलिसांकडून तुळशीबाग, मंडई येथे लावलेल्या दुचाकी उचलून अलका टॉकीज जवळील पोलिस चौकीजवळ रस्त्यावर लावल्या जातात. जेथून वाहने उचलतात. तेथे कुठेही ‘नो पार्किंग’चा फलक नाही. वाहने उचलताना नुकसान ही करतात. ही वाहने अलका चौकातील ‘नो पार्किंग’च्या फलका जवळच म्हणजे ‘नो पार्किंग’ मध्येच लावतात. मग, याचा दंड कोणावर आकाराचा ? मोठा दंड असल्यास वाहनचालकास दंडाचा मेसेज न पाठविता मिटवामिटली केली जाते. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे.
- शिवाजी ओंबळे, पुनावळे
PNE25V52641

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com