पिंपरी-चिंचवड
भक्ती-शक्ती चौकात उद्या स्वच्छता मोहीम
पिंपरी, ता. २३ : निगडीतील भक्ती-शक्ती चौकात गुरुवारी (ता.२५) सकाळी आठ वाजता विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘एक दिवस- एक तास- एक साथ’ उपक्रमांतर्गत महापालिकेने याचे आयोजन केले आहे. यात परिसर स्वच्छता आणि जनजागृती केली जाणार आहे. त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. ‘आपला परिसर, आपली जबाबदारी’ संदेश देत प्रत्येकाने समाजहितासाठी एक तास श्रमदान करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.