सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

वाकडच्या रस्त्यांवरील राडारोडा हटवा
वाकड येथील सखाराम वाघमारे चौक ते भुयारी मार्ग रस्ता/पदपथावर फार मोठ्या प्रमाणात चिखल साचून राडारोडा, पाईप, कचरा, घाण आहे. त्याने पदपथावर चालता येत नाहीत. चिखलात वाहने घसरून अपघात होतात. चिखलाने रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. अतिशय विदारक स्थिती निर्माण झाली आहे. वारंवार कळवून सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच नागरिक त्रस्त आहेत. कर भरूनही नागरी सुविधा मिळत नाहीत. तरी वाकडमधील सर्वच रस्त्यांवरील चिखल, कचरा, घाण, टाकाऊ साहित्य, पाईप हटवून स्वच्छता करून रस्ते वाहतुकीस उपलब्ध करून देण्यात यावेत.
- दिनेश जाधव, वाकड
PNE25V53177

कचराकुंड्यांजवळ कॅमेरे बसवा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण खूप मोठ्या प्रमाणात राबवत आहे. परंतु, काही लोक सुधारत नाहीत. असेच हे उदाहरण आहे. साईधाम सोसायटी शेजारील आणि मॅजेस्टिक हॉटेलच्याबाहेर हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा सतत टाकला जातो. त्या ठिकाणी कचरा टाकू नये असा महानगरपालिकेचा फलक आहे. पण, कुठेही असे फलक लावून उपयोग नाही. त्यावर एकच उपाय आहे. जेथे जेथे असा कचरा टाकला जातो. त्या ठिकाणी तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे लावून कचरा टाकणाऱ्यांकडून दंड वसूल केला जावा. तरच यात सुधारणा शक्य आहे.
- कृष्णा पिसाळ, आकुर्डी
PNE25V5317

यशवंतराव चव्हाण पुतळ्याचे सुशोभीकरण हवे
वल्लभनगर येथील माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. हा पुतळा काही महिन्यांपूर्वी महामेट्रोने मेट्रोच्या नियोजित स्थानकासाठी एसटीच्या वल्लभनगर आगारात स्थलांतरित केला. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ठरले होते की, पुतळ्याची सर्व स्थापत्य विषयक कामे महामेट्रोने करावीत. कोनशिला फलक, पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला लोखंडी प्रवेशद्वार, सीसीटीव्ही कॅमेरे पुतळ्याच्या सीमा भिंतीवर चव्हाण यांच्या कारकिर्दीतील ठळक घटना (म्युरल्स) यांचा समावेश असायला हवा. परंतु त्यातील सीमा भिंत सोडल्यास महामेट्रोने एकही काम केले नाही. महामेट्रो व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
25V53175

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com