सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

उड्डाणपुलाखालील दुचाकी पार्किंग अस्वच्छ

भक्ती-शक्ती उद्यान परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाते. पण सायंकाळपर्यंत उड्डाण पुलाखालील दुचाकी पार्किंगचा परिसर अस्वच्छ होतो.
निगडी भक्ती-शक्ती बस स्थानकातून प्रवास करणारे आपली दुचाकी उड्डाणपुलाखालील पार्किंगमध्ये ठेवतात. पण तेथील बेघर लोकांच्या लहान मुलांचे विधी, अंघोळी, धुणी यामुळे झालेला चिखल, उष्टे खरकटे यातच आपल्या दुचाकी ठेवाव्या लागतात. त्यामुळे या लोकांचे पुढील बाजूस स्थलांतर करावे.
-दयानंद कोकणे, कृष्णानगर, चिखली
- PNE25V54166

दिघी परिसरात पाइपलाइन फुटली

भोसरीतील डायमंड स्कूल दिघी रस्ता येथे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. पाइपलाइनचा व्हॉल्व्ह फुटल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या समस्येकडे पालिकेच्या जलविभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
-अविनाश चौधरी, दिघी रस्ता
-PNE25V54159

पदपथ दुरुस्त न झाल्याने नागरिक त्रस्त

वाकडमधील ओमेगा पॅराडाईज रस्ता, सर्व्हे नंबर १७३ येथे काही दिवसांपूर्वी झाडे लावण्यात आली होती. त्यावेळी पदपथावर खोदाई करण्यात आली होती. आता पुन्हा झाड लावल्याने पदपथ खराब झाला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित पदपथाची दुरुस्ती करावी.
-अशोक मोरवाल, वाकड
PNE25V54144

पुलाचे काम संपले, पण राडारोडा तसाच

भुजबळ चौकात वाकड पुलाखाली मागील काही दिवसापासून केबल आणि इतर साहित्य पडलेले आहे. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना समस्या येत आहेत. तसेच या ठिकाणी महिला बसची वाट पाहत उभा असतात. पुलाचे काम होऊन खूप दिवस झाले आहे. तरीही येथील राडारोडा उचलला गेलेला नाही.
-श्‍याम गायकवाड, वाकड
PNE25V54142


सबवेतील काचेच्या तुकड्यांमुळे अपघाताचा धोका

सांगवी फाटा सबवेमध्ये काचेचे तुकडे पडलेले आहेत. मागील आठ ते दहा दिवसांपासून हे साफ केलेले नाहीत. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
-ज्योती पेस्ट्री, सांगवी फाटा

NE25V54162

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com