बेशिस्तपणे उभ्या वाहनांवर कडक कारवाई

बेशिस्तपणे उभ्या वाहनांवर कडक कारवाई

Published on

पिंपरी, ता. २७ : रस्त्यात अथवा रस्त्यालगत कुठेही उभ्या वाहन केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. मागील आठ महिन्यांत ६८ हजार ६३५ दुचाकी तसेच १५ हजार ८८४ चारचाकी वाहनांवर टोईंग कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यासह अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवरही काही नागरिक बेशिस्तरित्या अस्ताव्यस्तपणे तसेच मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागतात. ही वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत टोईंग व्हॅन प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या अंतर्गत टोईंग कारवाई सुरू आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली जात आहे.
अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांना रस्त्यालगत वाहने उभे करावे लागते. तरी शहरात पुरेशा प्रमाणात पार्किंग उपलब्ध करून देण्यात यावी तसेच नो पार्किंगचे फलक स्पष्ट व ठळक दिसतील, असे असावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


शहरात पार्किंगसाठी पुरेशा जागा उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. एखाद्या ठिकणी वाहन उभे करायला जागाच उपलब्ध नसल्यास मिळेल त्याठिकाणी नाईलाजास्तव वाहन उभे करावे लागते.
- विकास पागिरे, नागरिक

चुकीच्या पार्किंगमुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो. नागरिकांनी अधिकृत पार्किंगचा वापर करावा. ‘नो पार्किंग’बाबतचे ठिकठिकाणी फलक उभारण्यात आलेले आहेत. यासह ध्वनिक्षेपकावरूनही आवाहन केले जात असते. तरी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

या आहेत अडचणी
- शहरात पुरेशा प्रमाणात अधिकृत पार्किंगची कमतरता
- ‘नो पार्किंग’ क्षेत्रातमध्ये अस्पष्टता
- सूचना फलक अभावी वाहनचालक अनभिज्ञ

नागरिकांनी हे करावे
- वाहने उभी करताना ‘नो पार्किंग’ फलक, पिवळ्या/पांढऱ्या पट्ट्यांची माहिती घ्या
- अधिकृत पार्किंगचे ठिकाण तपासा
- गर्दीच्या भागात शक्यतो सार्वजनिक वाहतूक वापरा


महिन्यानुसार टोईंग कारवाईची आकडेवारी
महिना दुचाकी दंड चारचाकी दंड
जानेवारी ६१६८ ३३०४००० १२९३ ७३५५००
फेब्रुवारी ७२३७ ३८१६५०० १५२४ ८५३०००
मार्च ९२२२ ४९४६००० १८३३ १०३३५००
एप्रिल ९३६३ ५०२२५०० २१३५ ११५५५००
मे ९०८१ ४८७२५०० २२९५ १२३५५००
जून ८८६७ ४७६५५०० २१९० ११९५०००
जुलै ९४४८ ५०७५००० २३११ १२५९५००
ऑगस्ट ९२४९ ४९३३५०० २३०३ १२४२५००
एकूण ६८६३५ ३६७३५५०० १५८८४ ८७१००००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com