मोशी रुग्णालयाचे काम मुदतीत पूर्ण करा

मोशी रुग्णालयाचे काम मुदतीत पूर्ण करा

Published on

पिंपरी, ता.२७ : महापालिकेच्या मोशी येथील ७०० खाटांच्या सामान्य रुग्णालयाचे काम जवळपास ५३ टक्के पूर्ण झाले आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली. हा प्रकल्प गुणवत्ता मानकांचे पालन करून मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, अनिल भालसाखळे, सह शहर अभियंता विद्युत, कार्यकारी अभियंता विजय भोजने यांच्यासह नगररचना, विद्युत अशा विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाले असून ते पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांची मुदत आहे. दिलेल्या मुदतीत प्रकल्पाचे काम पूर्णत्वाला नेण्याचे नियोजन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आठ मजली इमारत
मोशी रुग्णालयाचा प्रकल्प १५ एकर जागेत उभारण्यात येत असून त्यासाठी ३४० कोटी ६७ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या प्रकल्पाची तळमजल्यासह ८ मजली एकात्मिक वैद्यकीय आवार म्हणून रचना केली गेली असून एकूण बांधकाम क्षेत्र ५७ हजार ४५० चौरस मीटर आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहर व परिसरातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य सुविधा प्रकल्पांपैकी एक असेल.

सुविधा कोणत्या ?
- आपत्कालीन आणि ट्रॉमा केअर
- सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा
- रेडियोलॉजी, डायग्नोस्टिक्स, सायकायट्री,
- बालरोग, प्रसूती व स्त्रीरोग, अतिदक्षता विभाग
- डायलिसिस सेंटर, मॉड्युलर ऑपरेशन थियेटर्स, वॉर्ड्स
- आठव्या मजल्यावर कर्मचारी निवास, वसतिगृह, सभागृह, उपहारगृह


अशी असेल स्थापत्य रचना
- २०० किलोवॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर पॅनेल
- २०० केएलडी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प
- सेन्सरयुक्त ऊर्जा कार्यक्षम एलईडी लाईटिंग
- रेन वॉटर हार्वेस्टिंग, कमी प्रवाहाचे जल उपकरणे
- सेंद्रिय कचरा उपचार प्रकल्प
- फायर कर्टन, ऑक्सिजन सेन्सर्स, स्ट्रेचर-अनुकूल रॅम्प्स, प्री-एक्शन फायर सिस्टम्स
- २७४ चारचाकी आणि २५० दुचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा

आरोग्य सेवा केंद्राचेही नियोजन
भविष्यात मोशी रुग्णालयाचे आवार संपूर्ण आरोग्य सेवा व शिक्षण केंद्र म्हणून नियोजित आहे. त्यामध्ये २०० खाटांचे कर्करोग रुग्णालय (ऑन्कोलॉजी), १५० विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्मचाऱ्यांसाठी निवास सुविधा राहणार आहेत.


मोशी सामान्य रुग्णालय हा वैद्यकीय सेवा क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाचे काम आता अर्ध्या टप्प्यावर आहे. त्यामुळे, आमचा उद्देश हा गती टिकवणे आणि नागरिकांना नियोजित वेळापत्रकात आधुनिक, टिकाऊ आणि जागतिक दर्जाचे रुग्णालय आणि रुग्णसेवा मिळवून देणे आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com