भुयारी मार्ग पाण्याखाली

भुयारी मार्ग पाण्याखाली

Published on

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरातील बहुतांश भुयारी मार्गांत सक्षम सुविधा नाही. त्यामुळे अल्पशा पावसानेही त्यांत पाणी साचते. पावसाळी वाहिन्यांचे कमकुवत व्यवस्थापन, सदोष बांधकाम, नियोजनचा अभाव अन् त्यात भर म्हणजे प्रशासनाचे दुर्लक्ष. याचा फटका वाहनाचालकांसह पादचाऱ्यांनाही बसत आहे. भुयारी मार्गांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीला वारंवार तोंड द्यावे लागत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात १२ ते ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. असे एकूण एक हजार ३०० किलोमीटर अंतराचे मुख्य व अंतर्गत रस्ते आहेत. शहरातून पुणे-मुंबई, मुंबई-बंगळुरू आणि पुणे-नाशिक महामार्गही जातो. शहराच्या चोहोबाजूस ये-जा करण्यासाठी तसेच, सुरळीत रहदारीसाठी महापालिकेने प्रशस्त रस्त्यांसोबत पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवर अनेक ठिकाणी पूल; रेल्वे मार्ग, चौक आणि महामार्गांवर उड्डाणपूल उभारले. शहरात ही संख्या सुमारे ३५ आहे. तर, अनेक भुयारी मार्ग आणि ग्रेडसेपरेटर्सदेखील(समतल विलगक) आहेत. मात्र, सध्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची आणि वाकडमधील भुजबळ चौकाजवळील भुयारी मार्गासह भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे, मामुर्डी-किवळे येथील भुयारी मार्गांची दुरवस्था आणि परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी भुयारी मार्गांत पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे दोन ते तीन फुट पाणी साचते. वाहिन्या तुंबल्या आहेत. काही भुयारी मार्गांत नलिकाही दिसत नाहीत. हे पाणी साचल्यामुळे रस्त्यांवरील डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढताना खड्ड्यांचे दणके सहन करावे लागतात. काही वेळा दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. पादचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

ग्रेड सेपरेटरमधील रस्ते ‘खड्ड्यांत’
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी दरम्यान पिंपरी व मोरवाडी चौक, चिंचवड स्टेशन आणि आकुर्डी खंडोबा माळ चौक असे तीन समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) उभारले आहेत. त्यांती जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते आहे. वाहनांचेही नुकसान होत आहे. महापालिका इमारतीसमोरच ग्रेड सेपरेटरमध्ये खड्डे पडल्याने प्रशासनाला दिसत नाहीत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

पाणी साचणारे भुयारी मार्ग
पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी, वल्लभनगर, बजाज ऑटो कंपनीसमोर आकुर्डी; लोहमार्गाखालील शंकरवाडी व आकुर्डी रेल्वेस्थानक परिसर; आसवानी मार्ग (पिंपरी साई चौक); स्पाइन रस्त्यावर शरदनगर; देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाखालील ताथवडे, पुनावळे, भूमकर चौक वाकड, मामुर्डी-किवळे.

शहरातील भुयारी मार्गांची अवस्था बिकट आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
- रमेश जाधव, स्थानिक नागरिक, पिंपरी

काही भुयारी मार्गांतील पाणी निचरा व्यवस्था आणि नाल्यांची पातळी काहीशी समान आहे. त्यामुळे पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा निचरा न होता जास्त पाणी साठते. दोन पोर्टेबल पंप वापरून निचरा केला जातो. भुयारी मार्गांतील पाण्याचा निचरा होण्यासाठी कायस्वरुपी उपाययोजना करण्याचे नियोजन आहे.
- मकरंद निकम, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com