राहण्यासाठी नागरिकांची चऱ्होलीला पसंती

राहण्यासाठी नागरिकांची चऱ्होलीला पसंती

Published on

पिंपरी, ता. २८ ः चऱ्होली म्हणजे इंद्रायणी नदीच्या कुशीत वसलेले गाव. नैसर्गिकरीत्या इंद्रायणी नदीमुळे गावाचे सौंदर्य खुलले आहे. दहा वर्षांपूर्वी ताजा भाजीपाला पिकवणारे गाव. आताही भाजीपाला पिकवला जातोय. पण, शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्याजागी टोलेजंग इमारती, मोठमोठे गृहप्रकल्प उभारले आहेत. उभे राहात आहेत. कारण, या भागाला सर्वसामान्य नागरिकांसह मध्यमवर्गीयांनी स्वप्नातील घरासाठी पसंती दिली आहे. शुद्ध हवा, ग्रामीण संस्कृतीशी जवळीक व तीर्थक्षेत्राचे सानिध्य आणि चाकण-भोसरी- मरकळसारखा औद्योगिक परिसर अर्थात रोजगाराचे क्षेत्र जवळच असल्याने राहण्यायोग्य भाग म्हणून अनेकांनी चऱ्होली परिसराला पसंती दिली आहे.
पिंपरी चिंचवड उद्योगनगरीचे पूर्वेकडील उपनगर म्हणजे चऱ्होली. त्याला लागून असलेली खेड तालुक्‍यातील गावे म्हणजे धानोरे, चऱ्होली खुर्द, आळंदी देवाची, केडगाव. या भागाला नव्वद टक्‍क्‍यांपेक्षा अधिक निवासासाठी पसंती आहे. कारण, घराजवळच कंपनी; पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-आळंदी पालखी मार्ग, आळंदी-देहू रस्ता, आळंदी-चाकण मार्ग अशी कनेक्टिव्हिटी; दळणवळणासाठी उपयुक्त; शिवाय पिंपरी चिंचवड महापालिकेने चऱ्होली भागात अंतर्गत रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. आणखी काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. जुने पाणंद रस्ते, अरुंद रस्ते रुंद केले जात आहेत. त्याचा फायदा या भागाच्या विकासासाठी होत आहे.

सोयी-सुविधांनी युक्त
चऱ्होली गावात टपरीपासून मॉलपर्यंत आणि पथारीवाल्यापासून मोठ्या बाजारपेठेपर्यंतच्या सुविधा आहेत. सर्वच वस्तू प्रत्येक भागात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पुण्यातील बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची आवश्‍यकता आता या भागातील नागरिकांना राहिलेली नाही.

स्मार्ट ग्रीन सिटी चऱ्होली
कौलारू घरे ते स्मार्ट ग्रीन सिटीकडे वाटचाल करणाऱ्या चऱ्होली गावाने गेल्या काही वर्षांपासून कात टाकली आहे. वर्तमान व भविष्यकाळाचा विचार करून सुरू असलेले विकास प्रकल्प, प्रशस्त रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, स्मार्ट ग्रीन सिटी म्हणून चऱ्होलीला पसंती मिळत आहे.

विकासाचे नवे पर्व
चऱ्होली परिसरात विकासाचे नवे पर्व उभे राहत आहे. गुंतवणुकीसाठी बांधकाम व्यावसायिकांनी जास्त पसंती दिली आहे. नवनवीन गृहप्रकल्प उभे राहत आहेत. काही साकारले आहेत. नागरिक राहायला आले आहेत. निवांत शांत ठिकाण असल्याने नागरिक राहायला येत आहेत.

आध्यात्मिक देणगी
चऱ्होलीला मोठी आध्यात्मिक परंपरेची देणगी लाभली आहे. वारकऱ्यांचे तीर्थस्थान आळंदी जवळ आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे सुरू आहेत. त्याचा मोठा फायदा चऱ्होलीलाही होऊ लागला आहे. संत भेटीवर आधारित शिल्प श्रद्धास्थान ठरत आहे.

परिसरात महापालिका जलतरण तलाव, भव्य उद्याने, खेळासाठी मैदाने, सुसज्ज भाजी मंडई, पोलिस ठाणे शिवाय प्रशस्त रस्त्यांची सुविधा करणार आहे. त्यामुळे या परिसरात घर घेणे म्हणजे नागरिकांचे जीवनमान उंचावणे, असेच म्हणावे लागेल.

५५१७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com