पावसामुळे जनजीवन विस्कळित
पिंपरी, ता. २८ ः सलग २४ तासांपेक्षा जास्त वेळ सुरू असलेला पाऊस, धरणांतून सोडलेले पाणी, भुयारी मार्गांना आलेले तलावाचे स्वरूप आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे पिंपरी-चिंचवडमधील जनजीवन पुन्हा विस्कळित झाले.
खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. याशिवाय वाहतूक संथगतीने होऊन जवळपास सर्वच रस्त्यांवर नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शनिवारी (ता. २७) सायंकाळपासून पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी साचले. धरण क्षेत्रातही पाऊस झाल्याने पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रविवारी सकाळी नऊपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत ६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पावसामुळे पदपथांवरील विक्रेते आणि नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
शहराशी संबंधित धरणे शंभर टक्के भरली आहेत. पवना व कासारसाई या धरणांतून पवना नदीत; वडिवळे व आंद्रा या धरणांतून इंद्रायणी नदीत आणि मुळशी धरणातून मुळा नदीत विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांपासून पावसाने धरण परिसरात चांगलाच जोर धरला आहे. धरणांच्या खालील बाजूसही पावसाचा जास्त जोर असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नद्यांमध्ये होणारी आवक आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे नदीकाठच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
---
विसर्ग (रविवारी दुपारी ३ पर्यंत)
धरण / विसर्ग (क्यूसेक)
पवना / ३,६५०
वडिवळे / ५,२१६
कासारसाई / ४५०
आंद्रा / ९८०
मुळशी / ७,०००
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.