पूररेषेत १,६८६ अनधिकृत बांधकामे

पूररेषेत १,६८६ अनधिकृत बांधकामे

Published on

पिंपरी, ता. २८ : पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांच्या निळ्या पूररेषेत तब्बल एक हजार ६८६ अनधिकृत बांधकामे आढळली आहेत. त्यांचे खरेदी-विक्री व्यवहार होऊ नयेत, यासाठी संबंधित बांधकामांची यादी महापालिकेने दुय्यम निबंधक कार्यालयाला दिली आहे. शिवाय, बांधकामधारकांना नोटीसही बजावली आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर यांच्या आदेशानुसार आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्फे नदीकाठच्या बांधकामांची सखोल पाहणी करून ही यादी तयार केली आहे. यामध्ये व्यावसायिक दुकाने, रहिवासी घरे, पत्राशेड, आरसीसी बांधकामे, कच्च्या विटांची घरे तसेच भंगार साहित्याच्या दुकानांचा समावेश आहे. निळ्या पूरेरेषेत येणारी ही बांधकामे पूरप्रवण क्षेत्रात आहेत. त्यामुळे येथील व्यवहार होऊ नयेत, सामान्य नागरिकांची फसवणूक टाळली जावी, यासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे.

शहराच्या मुळा, पवना, इंद्रायणी नदीपात्रांतील निळ्या पूररेषेत येणाऱ्या अनधिकृत बांधकामांपासून नागरिकांनी दूर राहावे. त्यांबाबत कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी आवश्यक शासकीय पडताळणी करावी.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे
क्षेत्रीय कार्यालय / बांधकामे / बाधित ठिकाणे
अ / १६८ / भाटनगर, पिंपरी स्टेशन, पिंपरी मेन मार्केट
ब / ३१२ / वाल्हेकरवाडी, भोंडवे कॉर्नर, रावेत, केशवनगर, कासारवाडी
क / ३३१ / रिव्हर रेसिडेन्सी, जाधववाडी, मोईफाटा, कुदळवाडी
ड / ३९१ / वाकड गावठाण, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे निलख
ई / ५९ / मोशी टोलनाका, दाभाडे वस्ती, डुडूळगाव गावठाण
फ / ८६ / डिफेन्स कॉलनी, बग वस्ती, पाटीलनगर
ग / १७५ / पिंपरीगाव, पिंपरी वाघेरे, सुभाषनगर, संजय गांधीनगर
ह / १६४ / सांगवी, दापोडी, कासारवाडी
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com