सकाळ संवाद
सकाळ संवाद
बेवारस वाहनांवर कारवाई करा
महापालिका हद्दीतील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल अशा ठिकाणी अनेक बेवारस वाहने पडून आहेत. त्यामुळे धोका, अडथळा निर्माण होतो आहे. स्वच्छता व सुरक्षेसंदर्भात प्रश्न निर्माण होतात. अशा वाहनांवर महापालिका आणि पोलिस प्रशासनाने कारवाई करावी. असेच धुळीने माखलेले एक वाहन केएसबी चौकातील ग्रेडसेप्रेटरमध्ये बऱ्यांच दिवसांपासून उभे आहे. या वाहनामुळे विद्रुपीकरण, अतिक्रमण होत आहे. पालिका प्रशासनाने अशा वाहनांची विल्हेवाट लावावी.
- बी. एस. पाटील, संभाजीनगर, चिंचवड
PNE25V55415
वाहतूक नियंत्रक दिवे आवश्यक
रावेतमधील शिंदे वस्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणपती मंदिराजवळ रस्ता अरुंद आहेत. या चौकात वाहनांची रहदारी असते. या चौकात सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनचालक पुढे जाण्यासाठी पदपथाचा वापर करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून जीव मुठीत धरून चालावे लागते. या ठिकाणी लहान-मोठे अपघातही होतात. तरी या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे म्हणजेच सिग्नल त्वरित उभारावेत. अथवा पूर्णवेळ वाहतूक पोलिस नेमण्यात यावेत. त्यामुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवता येईल.
- रवींद्र नारायण माळवदे, शिंदे वस्ती, रावेत
PNE25V55413
मैलायुक्त पाणी मुळा नदीपात्रात
सांगवी गाव येथील शितोळे पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या मुळा नदीपात्रात मैलायुक्त पाणी सोडले जात आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने दुर्लक्ष केले आहे. फक्त नदी सुधार समिती स्थापन झाली आहे. लवकरच नदी प्रदूषण थांबून नदीपात्र स्वच्छ होणार आहे असे सांगितले जात आहे. पण, प्रदूषित पाणी थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE25V55414
पादचारी मार्ग अखेर मोकळा
चिंचवड पादचारी मार्गांवर वाहने पार्क केल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना रस्त्यावरून जावे लागते. या समस्येमुळे पादचारी मार्ग अरुंद होत आहेत. नागरिकांना चालण्यासाठी सुरक्षित जागा मिळत नाही. पालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिक वाढली होती. याबाबत ‘पादचारी मार्गावर पार्किंगमुळे अडचण’ अशा आशयाचे माझे पत्र १३ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर येथील पादचारी मार्ग मोकळा झालेला दिसतो. ‘सकाळ’चे आभार.
- रमेश देव, चिंचवड
PNE25V55416
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.