जागेची बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक

जागेची बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक

Published on

पिंपरी : जागेची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर दुसऱ्या लोकांना जागेची विक्री करून महिलेची दोन कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जी. अनिलकुमार गुजुला (रा. मारुंजी), नरेंद्र फकिरा गिरी (रा. पिंपळे सौदागर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी आणि त्यांच्या भावाने मारुंजी येथील सहा गुंठे जागा तिघांकडून रजिस्टर कुलमुखत्यार पत्र आणि साठेखताने लिहून घेतली होती. त्या जागेची आरोपींनी परस्पर बनावट कागदपत्रे बनवून जागेची विक्री केली. या व्यवहारात फिर्यादी महिलेची दोन कोटी ४० लाखांची फसवणूक केली.

ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण
पिंपरी : ट्रॅफिक वॉर्डन वाहतूक सुरळीत करीत असताना एका बसमधील तरुणाने ट्रॅफिक वॉर्डनला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना चिंचवड स्टेशन येथे घडली. या प्रकरणी ट्रॅफिक वॉर्डन अनिल साह (रा. पिंपरी कॅम्प) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर राजू चिंचवले (रा. केसनंद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि त्यांचे सहकारी हे चिंचवड स्टेशन येथे ड्युटीवर असताना वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करीत असताना एका बसमधून आरोपी सागर खाली उतरला आणि पुढे असलेल्या एका मोटार चालकाशी वाद घातला. दरम्यान, फिर्यादीने वाद का करत आहात, असे विचारले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. मारहाण करून सिमेंटचा तुकडा फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने त्यांना दुखापत झाली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत नवनाथ रामचंद्र गंभिरे (वय ६५) या पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथील नेवाळेवस्ती येथे घडली. नवनाथ गंभिरे हे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यात त्यांच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

कंपनीतून दीड लाखांच्या साहित्याची चोरी
पिंपरी : कंपनीच्या गेटचे कुलूप उघडून चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना चिखलीतील सोनवणेवस्ती येथील युनिक ग्रुप कंपनीत घडली. या प्रकरणी संदीपकुमार बाजिया (रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुकेश विजय सिंग (वय २८), बिटु कुमार सुरेश (वय २०), नसिम अब्दुल करिम साह (वय २०), समिउल्ला साह फैजुलउल्ला साह (वय २६), मोहम्मद नसिम नुरमहम्मद साह (वय २३) यांना अटक केली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या युनिक ग्रुप कंपनीच्या गेटचे कुलूप उघडून कंपनीतून एकूण एक लाख ५३ हजार ९९० रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या प्लेट्स चोरल्या.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com