घशातील नाणे बाहेर काढून बालिकेला जीवदान

घशातील नाणे बाहेर काढून बालिकेला जीवदान

Published on

पिंपरी, ता. ३० ः लहान मुलीच्या घशात अडकलेले पाच रुपयांचे नाणे दुर्बिणीद्वारे बाहेर काढून तिला जीवनदान देण्यास जीवन ज्योती हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले आहे.
गेल्या आठवड्यात एक तीन वर्षाची मुलगी अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली. घशात नाणे अडकल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. हे नाणे तिच्या अन्ननलिकेच्या खूप वरच्या भागात अडकले असल्याचे तपासणीअंती लक्षात आले. त्यामुळे, तिच्या श्वास नलिकेवर दबाव निर्माण होऊन श्वास घेण्यास अडचण निर्माण होत होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला भूल देऊन एंडोस्कोपी करून नाणे बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर हे नाणे दुर्बिणीतून बाहेर काढण्यात आले. जीवन ज्योती हॉस्पिटलमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनेश काळे, डॉ. चंद्रशेखर अन्नदाते, डॉ. अतुल दायमा, एंडोस्कोपी तज्ञ डॉ. अनिकेत, भूलतज्ञ डॉ. सारिका, डॉ. आकाश यांनी विशेष प्रयत्न केले व नाणे बाहेर काढले. ही प्रक्रिया खूप किचकट होती. नाणे अन्ननलिकेत अडकून बसले होते. बाहेर काढताना श्वास नलिका दाबली जात होती आणि त्यामुळे श्वास कमी होऊन ऑक्सिजनची पातळी कमी होत होती. डॉक्टरांच्या पथकाने अथक प्रयत्न करून नाणे बाहेर काढले आणि तिचा श्वास सुरळीत केला.

पाच ते सहा वर्षांचे होईपर्यंत मुले अनवधानाने वस्तू तोंडात घालतात. त्यामुळे खेळताना नाणी, चावी, स्क्रू, खिळे अशा टोकदार वस्तू त्यांच्या हातात देऊ नयेत. या वस्तू तोंडात घालतात व असे अपघात होतात. काही वेळा हे जिवावरही बेतू शकते.
- डॉ. चंद्रशेखर अन्नदाते, जीवन ज्योती हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com