पोलिसांकडून ४२ गुन्हेगार तडीपार

पोलिसांकडून ४२ गुन्हेगार तडीपार

Published on

पिंपरी, ता. ४ : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले असून तीन टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली.
परिमंडळ दोनच्या हद्दीतून गेल्या महिन्यात २२ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्हा व रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका हद्दीतून तडीपार करण्यात आले. यामध्ये सौरभ काळे, हनुमंत शिंदे, ओमकार सोनवणे, राहुल तेलगू, दत्तात्रय शिंदे, नितीन सोमवंशी, राहुल नट, अक्षय नट, नितीन सोनवणे, चेतन विटकर, अरुण राजपूत, अमित कलाटे, करण लोखंडे, अमर चव्हाण, मंगेश सायकर, विजय ऊर्फ किरण भालेराव, प्रथमेश शिंदे, नितीन शेळके, हर्ष उर्फ सोन्या साठे, प्रियांका राठोड, अनिल जाधव, गणेश पारखे यांचा समावेश आहे.
परिमंडळ तीनच्या हद्दीतून १७ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. यामध्ये रविना राठोड, मंजिला राठोड, विशाल सगट, गंगाराम ओव्हाळ, संजय गाडे, जिलाणी सय्यद, सोमेश लोखंडे, माऊली कलवडे, गणेश क्षीरसागर, रमाकांत सोनवणे, फुलवंती राठोड, आशा नट, शिवाजी कोळेकर, अंकुश तांदळे, अनिकेत कडलक, बबलू टोपे, किशोर पवार यांचा समावेश आहे.
परिमंडळ एकच्या हद्दीतून किरण उर्फ बंटी खरात, मानतेश उर्फ मुत्या याळगी, संजय दादाभाऊ माने या तिघांना पोलिसांनी तडीपार केले. सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे असा तडीपारीचा कालावधी आहे.
तीन टोळ्यांवर मकोका
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) कारवाई झालेल्या तीन टोळ्यांमधील गुन्हेगारांची नावे ः
१) सूरज ऊर्फ सोन्या पवार, ऋषीकेश कांबळे, कृष्णा कांबळे, प्रज्वल मुदळ, युसुफ शेख, अभिषेक ऊर्फ क्रिश वायकर, कालीचरण ठाकूर, विजय ऊर्फ गोट्याभाई ठाकूर, साहिल सांगळे, ओंकार भारती, कुलदीप कांबळे, जय निकटे, एक विधीसंघर्षीत मुलगा
२) सुनील ठाकूर ऊर्फ सुनील शेट्टी, सूरज ऊर्फ पिल्या शिंदे, कृष्णा ऊर्फ चंग्या धाईजे, शिवराज ऊर्फ शिवऱ्या चव्हाण
३) नितीन शिंदे, वैभव माने, विशाल जाधव, विशाल भोसले
-----------
चारजण कारागृहात स्थानबद्ध
हर्ष बहोत (रा. सेनेट्री चाळ, पिंपरी), रामदास हानपुडे (रा. सुभाषवाडी, निघोजे) यांना हरसुल मध्यवर्ती कारागृहात (छत्रपती संभाजीनगर), प्रल्हाद बच्चे (रा. हेद्रुज ता. खेड ) याला मध्यवर्ती कारागृहात (अमरावती), तर स्वप्निल पवार (रा. मोहितेवस्ती, माण, मुळशी) याला नाशिक रोड मध्यवर्ती कारगृहात स्थानबद्ध करण्यात आले.
-----------------------------------

Marathi News Esakal
www.esakal.com