सोनवणे वस्ती रस्त्यावरील झाडे मृतावस्थेत

सोनवणे वस्ती रस्त्यावरील झाडे मृतावस्थेत
Published on

चिखली, ता. ३१ ः सोनवणे वस्ती रस्त्याचे महापालिकेकडून सध्या रुंदीकरण सुरू आहे. त्यामध्ये रस्त्याला अडथळा ठरणारी आश्रम परिसरातील अनेक झाडे तोडण्यात आली. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्रोपण न केल्याने काही दिवसांतच झाडांना मृतावस्था प्राप्त झाली आहे. त्यामध्ये फळझाडांबरोबरच इतर झाडांचा समावेश आहे.
महापालिकेच्या नियमानुसार रस्त्यामध्ये अथवा एखाद्या विकास कामामध्ये येणारी झाडे तोडून त्याचे पुनर्रोपण केले जाते. मात्र, संबंधित ठेकेदारांकडून झाडे उपटून ती व्यवस्थित लावली जात नाहीत. झाडे काढताना ती संपूर्ण मुळासकट काढली जात नाहीत. झाडे काढताना त्यांची साल सोलून निघते. त्यामुळे झाडाचे पुनर्रोपण केले तरीही ती झाडे जगत नाहीत. काही दिवसांनी ती झाडे मरून जातात. उन्हाळ्यात तर झाडे जगण्याचे प्रमाण अत्यल्प असते.
सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह पाटील म्हणाले,‘‘नागरिकांच्या करातून झाडे लागवडीसाठी खर्च केला जातो. महापालिका एक झाड लावण्यासाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च करते. मात्र अशा प्रकारे झाडांची फरपट करून त्याची लागवड केल्यास झाडे जगत नाही आणि खर्चही वाया जातो.’’
महापालिकेचे उद्यान अधीक्षक रमेश वासावे म्हणाले, ‘‘झाडांच्या उंची आणि बुंध्यानुसार लागवडीसाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. वड, पिंपळ यासारखी झाडे जगण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र आंबा, जांभूळ आणि इतर फळ झाडांचे प्रमाण जगण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यासाठी त्यांना काढताना मुळासकट काढून त्याचे पुनर्रोपण करावे लागते. तेव्हाच ते झाड जगते.’’

PNE25V02151

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com