अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्यार्थी
सरकारी शिष्यवृत्तीपासून वंचित

अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्यार्थी सरकारी शिष्यवृत्तीपासून वंचित

Published on

पिंपरी, ता. २४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृती प्रदान केली जाते. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत ४५ हजार विद्यार्थ्यांचे बॅंक खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न नसल्याने केंद्र शासनाच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे सर्व महाविद्यालयांतील प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची प्रक्रिया विशेष मोहीम राबवून तातडीने पूर्ण करून घ्यावी, अशी सूचना समाज कल्याण विभागाने दिली आहे.
गेल्या तीन शैक्षणिक वर्षांतील केंद्राचा ६० टक्के हिस्सा वितरणासाठी प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांच्या डेटा क्यूआर कोडवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांकडून https://www. npci.org.in लिंकवरील प्रणालीचा वापर करून आधार बॅंक लिंक प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर महाविद्यालयस्तरावर त्याची खातरजमा करून त्याचा डेटा त्वरित दिलेल्या क्यूआर कोडचा वापर करून जिल्हा व महाविद्यालय निवडावे. या डेटा लिंकचा वापर करण्याकरिता Pass@१२३ हा पासवर्ड टाकून महाविद्यालयनिहाय व विद्यार्थीनिहाय माहिती अद्ययावत करावी. जेणेकरून हा डेटा केंद्र शासनास फेरसादर करता येईल. यामुळे आधार संलग्न नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम त्यांचा बॅंक खात्यात जमा करण्याची प्रकिया केंद्र शासनाकडून लवकरात लवकर सुरू होईल. अनुसूचित जातीचा कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास महाविद्यालयावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com