पारंपारिक मतदार ठरवणार कल
प्रभाग १५ ः निगडी प्राधिकरण-आकुर्डी गावठाण
पारंपरिक मतदार 
ठरविणार कल
- अश्विनी पवार
निगडी प्राधिकरण व आकुर्डी गावठाण प्रभागाचा बहुतांश भाग उच्चभ्रू लोकवस्तीचा आणि बैठी घरे, बंगल्यांचा आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व जुने मतदारच येथील उमेदवारांचे भवितव्य घडविणार आहे. येथील मतदार पक्षापेक्षा उमेदवाराचे काम पाहून मतदान करणारा आहे. त्यामुळे २०१७ पूर्वी येथे निवडून आलेले नगरसेवक वेगळ्या पक्षाचे होते. तर २०१७ मध्ये परिस्थिती वेगळी होती. उमेदवाराने केलेली विकासकामे, त्याचा जनसंपर्क, जनतेचे सोडविलेले प्रश्न यावर ही निवडणूक होऊ शकते.
समाविष्ट भाग
आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूक नगरी, सेक्टर क्रमांक २४, २५, २६, २७, २७ अ,२८ सिंधूनगर, परमार पार्क, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंद्रीय वसाहत, एलआयजी, एक्साईज कॉलनी इत्यादी.
पक्षीय स्थिती
- भाजपकडून उमेदवारीसाठी सर्वाधिक इच्छुक
- भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत राहण्याची शक्यता
- महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविल्यास भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता
- उमेदवाराचा जनसंपर्क, कामे व त्याला मिळणारे गठ्ठा मतदान हे महत्त्वाची भूमिका बजावणार
दृष्टीक्षेपात
- हरित सेतू, पदपथ, खराब रस्ते, सतत खंडित होणारी वीज हे मुद्दे ठरणार महत्त्वाचे
- भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास इच्छुकांची राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती 
- प्राधिकरण व परिसरातील नागरी समस्यांमुळे नागरिकांचा रोष
- नागरी समस्यांवर सोडविणाऱ्या उमेदवारांचे पारडे जड 
प्रचारातील संभाव्य मुद्दे
- राहण्यास उत्तम, चांगले रस्ते
- भरपूर हिरवळ 
- सध्या रस्ते, खड्डे, पाणी, वीज, कचरा समस्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

