शहरातील गुन्हे विषयक बातम्या

शहरातील गुन्हे विषयक बातम्या

Published on

पिंपरीत तीन अल्‍पवयीन मुलांचा
तरुणावर कोयत्याने खुनी हल्‍ला
पिंपरी : जुन्या वादाच्या रागातून तीन अल्‍पवयीन मुलांनी एका तरुणावर लोखंडी कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पिंपरीतील सम्राट चौकाजवळील मैत्री बौद्ध विहार परिसरात शनिवारी (ता. २५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अरिफ शेख (वय २३, रा. मस्जिद शेजारी, जुन्या कोर्टमागे, मोरवाडी) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यावरून १७ वर्षे वय असलेल्या तीन अल्‍पवयीन मुलांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. फिर्यादी आपले मित्र केविन सोनवणे आणि जावेद शेख (वय १७, रा. मोरवाडी, लालटोपी नगर, पिंपरी) यांच्यासह रिक्षात बसले होते. मोटारसायकलवर आलेल्या तिघा विधीसंघर्षित बालकांनी फिर्यादीवर हल्ला केला. एका अल्‍पवयीन मुलाने लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यात, पाठीवर आणि हातावर वार केले, तर इतर दोघांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.
---
मोबाईल हिसकावणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
पिंपरी : फोनवर बोलत असलेल्या तरुणाचा सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेलेल्या दोन चोरट्यांना पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून अटक केली. ही घटना शनिवारी (ता. २५) पहाटे पाच वाजताच्‍या सुमारास घडली. याप्रकरणी हुजेफ गोलंदाज (वय २८, रा. नळबाग, वाघ गल्ली, घर क्रमांक २२२, सांगली) यांनी वाकड पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. फिर्यादी बहिणी रमेजाशी मोबाईलवर स्पीकर ऑन करून बोलत होते, तेव्हा रिक्षातून आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. वाकड पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून दोन्ही आरोपींना अटक केली. सुनील शिंदे (वय ४०) आणि विजय काळे (वय २१, दोघे रा. मातोबा नगर, दत्तमंदिर रोड, वाकड, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
---
उसने पैसे मागितल्याने महिलेला मारहाण
पिंपरी : उसने दिलेले दीड लाख रुपये परत मागितल्याने संतापलेल्या शेजाऱ्याने एका महिलेला स्टीलच्या कड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. भोसरीतील इंद्रायणीनगर परिसरात रविवारी (ता. २६) दुपारी दीडच्‍या सुमारास हा प्रकार घडला. सुनील धुनघव (वय ४२, रा. लांडेवाडी, विठ्ठलनगर, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ३० वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. सुनीलने महिलेला याने शिवीगाळ करून कड्याने तिच्या डोक्यावर आणि नाकावर मारले.
---
दुचाकीच्‍या धडकेत वृद्धाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव दुचाकीने धडक दिल्‍यामुळे ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. सात ऑक्टोबर रोजी रहाटणी येथे बीआरटी रस्त्यावर ही दुर्घटना घडली. याप्रकरणी विकास पाटील (वय ५०, रा. शिवतीर्थ नगर, श्रीनगर, रहाटणी, पुणे) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यांचे वडील गोविंद पाटील दुचाकी शोरूमसमोरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी योगेश माकोणे (रा. महाळुंगे, बालेवाडी, पुणे) याच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. उपचारादरम्यान पाटील मरण पावले.
---
मोशीत गुटखा विकणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी : शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना एक तरुण रंगेहात पकडला गेला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी रविवारी (ता. २६) सकाळी मोशीतील तापकीर नगर परिसरात ही कारवाई केली. सुनील चौधरी (वय १९, रा. चौधरी फरसाण, तापकीर नगर, मोशी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार महेश खांडेकर (वय २९) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. आरोपीकडून सात हजार ८६६ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com