पिंपरी-चिंचवड
सकाळ संवाद
तळेगाव दाभाडे स्मशानभूमीतील दिवे बंद
तळेगाव दाभाडे येथील ग्रामीण भागातील स्मशानभूमीत हायमास्ट दिव्याच्या खांबाचे आठ पैकी दोनच दिवे चालु असून सहा बंद अवस्थेत आहेत. त्यातील दोन गायब झाले आहेत. रात्री अपरात्री या ठिकाणी नागरिकांना स्वकीयांचे अंतिम संस्कार करण्यासाठी यावे लागते. याविषयी नगरपालिका प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे. येथील आठही दिवे तत्काळ प्रकाशमय व्हावेत, अशी नगरपालिका प्रशासन आणि विद्युत विभागाला विनंती आहे.
-दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
PNE25V64213
कालिका मंदिर परिसरात धोकादायक खड्डा
पिंपरी चिंचवड लिंक रस्ता स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील कालिका माता मंदिर जवळ रस्त्यावर धोकादायक खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन हा खड्डा लवकर बुजवावा.
-राजेश डावरे, लिंक रोड
PNE25V64214

