नेहरुनगरमध्ये गढूळ पाणी पुरवठा

नेहरुनगरमध्ये गढूळ पाणी पुरवठा

Published on

पिंपरी, ता. १ : संत तुकारामनगर आणि नेहरुनगर परिसरातील नागरिकांना शुक्रवारी (ता. ३१) सकाळपासून लालसर, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. त्‍यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. निगडीतील भक्ती-शक्ती चौक परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कामामुळे सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नेहरुनगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्यात आली. या कारणास्तव गुरुवारी (ता. ३०) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी पुरवठा सुरू झाल्यानंतर नळांमधून गढूळ पाणी येऊ लागले. पहाटेपासूनच पाणी वापरण्यायोग्य नसल्याने आम्हाला ते फेकावे लागले, असे नागरिकांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com