सांगवीच्या विकासाचे शिलेदार प्रशांत शितोळे ‘सरकार’

सांगवीच्या विकासाचे शिलेदार प्रशांत शितोळे ‘सरकार’

Published on

सांगवीच्या विकासाचे शिलेदार


इंट्रो ः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रेरणा घेऊन प्रशांत शितोळे यांनी सांगवी परिसराचा विकास केला. सांगवी गाव ते उपनगरापर्यंतच्या विकास पर्वात त्यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. राजकारण विरहित समाजकारण केले. तरूणाईच्या उमद्या काळापासून २००२ ते २०१७ या वर्षांत सलग तीनवेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष ते पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशा जबाबदाऱ्या स्वीकारताना त्यांनी राजकारणातील चढ-उतारही अनुभवले.
महापालिकेत सत्ता बदल आणि त्यानंतरच्या प्रशासकीय राजवटीत सांगवीच्या विकास पर्वाची गती मंदावली. त्यामुळे त्यांना आता येत्या आगामी काळात विविध विकास कामांची उणीव भरून काढायची आहे.
---------------------
सांगवी गाव ते उपनगर या सांगवीच्या सर्वांगीण विकासात प्रशांत शितोळे यांचे अतुलनीय योगदान आहे. सत्ता असो नसो कायमच सांगवीकरांच्या हितासाठी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे धोरण अवलंबून सांगवीच्या विकास पर्वासाठी अहोरात्र झगडणारा नेता ही ओळख घराघरांत आहे‌. साहित्य वाचन, लेखन, शेरोशायरी या आवडी त्यांनी जपल्या आहेत. कविमनाचा ‘सरकार’ ही ओळखही त्यांनी त्यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्वच्या कोपऱ्यात जतन करून ठेवलेली आहे. त्यांच्यातील अभ्यासू परखड वक्ताही पिंपरी चिंचवड शहराने अनुभवला आहे‌. समाज हित, विकासाच्या कामात पुढे व चुकीच्या कामांना प्रखर विरोध असे धोरण त्यांनी जपले आहे.

सांस्कृतिक वैभवपर्व
सीझन सोशल वेल्फेअर ट्र्स्टच्या माध्यमातून प्रशांत शितोळे यांनी अनेक नानाविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले. वारकरी संप्रदायामधील विविध सेवांचा अनुभव घेत धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम परिसरासाठी घेतले. सांगवी, पिंपळे गुरव परिसराला एक सांस्कृतिक वैभव देण्यासाठी २००० च्या गणेशोत्सवापासून सांगवी महोत्सव सुरू करण्यात आला. त्यात ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’, ‘आयुष्यावर बोलू काही’ आदी त्यांच्या संस्थेमार्फत झालेले कार्यक्रम अविस्मरणीय ठरले.

विकास कार्यात अग्रेसर
पिंपरी-चिंचवडमधील पहिला आदर्श मॉडेल वॉर्ड ही संकल्पना राबवून शितोळे यांनी जुनी सांगवीचा शाश्वत विकास केला.
पिंपरी चिंचवड, पुणे शहराचे प्रवेशद्वार असलेला सांगवी बोपोडी पूल ‘सरकार शितोळे सेतू’ सांगवी फाटा येथील महात्मा जोतिबा फुले उड्डाणपूल, वेताळ महाराज मंदिर ढोरे-पाटील भुयारी मार्ग, अंतर्गत प्रशस्त रस्ते, पहिली पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी, पवना नदी काठावरील स्मशानभूमी घाट सुशोभीकरण ही प्रमुख कामे करण्यात आली. कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव बांधण्यात आला. मुळा नदी किनारा भागातील प्रस्तावित रस्ते वाहतुकीसाठी सुरू केले. मुळा नदीवरील सांगवी - बोपोडी सरकार शितोळे सेतू पूल सांगवीच्या वैभवात भर घालत आहे. सद्यःस्थितीत सुशोभीकरण कमान टाकण्याचे काम सुरू आहे.

सुंदर सांगवी, स्वच्छ सांगवी
पिंपरी चिंचवडमध्ये ‘सुंदर सांगवी, स्वच्छ सांगवी’ अशी ओळख शितोळे यांनी निर्माण केली. आता, नवीन पद्धतीने हाच विकास रथ पुढे नेण्यासाठी समाज घटकांच्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचे शितोळे यांचे नियोजन आहे. विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, युवा उद्योजक, व्यापारी, कलाकार यांचा विचार करून त्यांना नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरवला आधुनिकतेची जोड देत प्रगतीपथावर न्यायचे आहे. सुंदर विकसित सांगवी उपनगर; तर जगात पिंपरी चिंचवडची एक आदर्श शहर म्हणून त्यांना ओळख निर्माण करायची आहे.

महिला स्वावलंबन
शिव-जिजाऊ महिला प्रतिष्ठानद्वारे महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या स्वावलंबन, सक्षमीकरणाच्या प्रवासाला सुरुवात झाली. शितोळे यांनी एकाचवेळी एक हजार ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप व
आनंदी आरोग्य ज्येष्ठ नागरिक कार्डाचे वाटप केले. ज्येष्ठांच्या विविध अनुभवांचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवा महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या.

विकासात मागे पडल्याची खंत
महापालिकेत सत्ता बदल झाला. त्यानंतरच्या प्रशासकीय राजवटीत सांगवीच्या विकास पर्वाची गती मंदावली. गेल्या काही वर्षांत सांगवीत एक ही नवा प्रकल्प किंवा शाश्वत विकास कामे झाली नाहीत. उद्याने, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया, कचरा संकलन, घाटांचे सुशोभीकरण, महापालिका दवाखान्याचे लोकसंख्येच्या तुलनेत विस्तारीकरण, नदी स्वच्छता प्रकल्प, बंद असलेले भाजी मार्केट, क्रीडांगण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र, २४ x ७ स्वच्छ पिण्याचा पाणी पुरवठा, शहरातील पहिली पर्यावरणपूरक शवदाहिनी, स्मशानभूमी या प्रश्नांना खीळ बसली आहे. शितोळे यांच्या मनातील ती खंत आहे. येत्या आगामी काळात त्यांना त्या उणीवा भरून काढायच्या आहेत.

सर्वांनाबरोबर घेत समाजहित
सर्व समाज घटक, लहान-मोठ्यांना बरोबर घेऊन प्रशांत शितोळे यांनी जनहिताला प्राधान्य दिले. स्वच्छ, सुंदर, प्रशस्त रस्ते, उद्याने, भव्य सुरेख मंदिरे, कामगार, उद्योजक, व्यापारी, छोटे व्यावसायिक सर्वांना आपली वाटावी अशा सांगवीच्या विकासाची संकल्पना घेऊन ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी शितोळे यांनी केलेले काम सांगवीच्या प्रत्येक विकास कामात पाहायला मिळते.

माझा प्रभाग, माझी जबाबदारी
सार्वजनिक आरोग्यासाठी सांगवीत भविष्यात महापालिकेच्या माध्यमातून ५० खाटांचे रुग्णालय उभे करणे हा शितोळे यांचा संकल्प आहे. भाजी मंडईची झालेली दुरवस्था पाहता याच ठिकाणी अत्याधुनिक शॉपिंग मॉलसह भाजी मार्केट उभारण्याचा त्यांचा मानस आहे. स्मार्ट सिटीमध्ये सांगवी परिसराचा सर्वसमावेशक असा विकास पुढील काळात अनेक पटीने स्मार्ट पद्धतीने करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

कामांच्या गुणवत्तेला प्राधान्य
विकास कामे करताना केवळ ते करायचे म्हणून न करता कामाची गुणवत्ता, दर्जा व परिसराच्या सौंदर्यपूरक उपाय योजना, कामाचा कालावधी आदी बाबांचा विचार करून प्रशांत शितोळे यांनी कामे साकारली. मग ते रस्ते असोत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन असो. धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण असो की उद्याने असोत, अशी त्यांनी केलेली कामे गुणवत्तेच्या निकषांवर वाखाणण्याजोगी आहेत.

सामाजिक कार्य
सीझन सोशल वेल्फेअर ग्रुप ट्रस्टच्यावतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक योजना, शालेय साहित्य वाटप, छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी ते यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका- वाचनालय, महाराष्ट्र केसरीच्या आयोजनात सहभाग, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा, महिला आरोग्य तसेच २० हजार नागरिकांना स्वाईन फ्ल्यू लस, रामदेवबाबांचे योग शिबिर आयोजनात सहभाग, असे शेकडो उपक्रम नागरिकांच्या पाठिंब्यामुळे शितोळे यांनी यशस्वी केले. यापुढेही समस्त सांगवीकरांच्या पाठबळाने ते करत राहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.


मतदारांची विकासाला साथ
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अस्तित्वाच्या लढाईत सक्षमपणे बळ मिळाले आहे. भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीत युतीधर्म पाळत विजयश्री मिळविली. आता हाच युतीधर्म महापालिका निवडणुकांमधून दिसणे अपेक्षित आहे. मतदारराजा विकासपर्वाला साथ देत आहे. हे त्या निवडणुकीतून सिद्ध झाले. जगातील आदर्श पिंपरी चिंचवड शहर व शहरातील स्मार्ट सांगवी व चिंचवड विधानसभा, असे काम शितोळे यांना आगामी काळात करायचे आहे.
शब्दांकन : रमेश मोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com